१३० वाहने, १७५ धर्माभिमानी
पनवेल : ‘लाना होगा लाना होगा हिंदु राष्ट्र लाना होगा’।, ‘कौन चले रे कौन चले हिंदु राष्ट्र के वीर चले ।’ अशा क्षात्रतेजयुक्त घोषणा ४ जानेवारीला पनवेल शहरात संध्याकाळी दुमदुमल्या… ! निमित्त होते हिंदु जनजागृती समितीप्रणीत हिंदुत्वनिष्ठांनी काढलेल्या वाहनफेरीचे ! भगवे ध्वज, भगवे फेटे आणि एक दिलाने, एका ध्येयेने वाहने चालवत हिंदुत्वाचा पुकार करणारे हिंदुत्वनिष्ठ येणार्या हिंदु राष्ट्राची जणू ग्वाहीच देत होते !
६ जानेवारी या दिवशी पनवेल येथील मिडल क्लास सोसायटीच्या मैदानात सायंकाळी ५ वाजता होणार्या राष्ट्र-जागृती सभेच्या निमित्ताने जनजागृती करण्यासाठी आणि समस्त हिंदूंना सभेत उपस्थित रहाण्याचे आमंत्रण देण्यासाठी या फेरीचे आयोजन करण्यात आले होते. फेरीच्या आरंभी धर्मध्वजाचे पूजन श्री. आणि सौ. विनायक वाकडीकर यांनी केले. या वेळी श्री. बल्लाळ काणे यांनी पौरोहित्य केले. पनवेल येथील स्वातंत्र्यवीर सावरकर चौक येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुमार जोशी यांनी पुष्पहार अर्पण केला.
ओरिएन मॉलपासून आरंभ झालेल्या या अत्यंत जोशपूर्ण फेरीची अखेर शिवाजी चौक येथे झाली. या ठिकाणी फेरीचे छोट्या सभेत रूपांतर झाले. येथे सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. नरेंद्र सुर्वे यांनी उपस्थित हिंदुत्वनिष्ठांना संबोधित केले, तसेच आप्तस्वकियांसह मोठ्या संख्येने फेरीस उपस्थित रहाण्याचे आवाहन केले !
विशेष !
लाईन आळी येथील मारुती मंदिर, श्री गणेश मंदिर, गावदेवी मंदिर येथे फेरीतील धर्मध्वजाचे पूजन करण्यात आले.
उपस्थित मान्यवर !
स्वराज मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष गुरुनाथ मुंबईकर, करणी सेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या क्षत्राणी अमीता चौहान
क्षणचित्रे !
१. रस्त्यावरील नागरिक फेरीचे चित्रीकरण करत होते !
२. अनेक वाहन चालक नागरिक फेरीसाठी स्वतःहून रस्ता मोकळा करून देत होते !
३. रघुनंदन शर्मा या व्यापार्याने ‘हिंदु राष्ट्र यायलाच पाहिजे !’, असे म्हणून हात जोडून फेरीला नमस्कार केला !