Menu Close

प्रयागराज कुंभमेळ्याच्या कालावधीत होत असलेल्या धर्मकार्यात सहभागी होण्याची सुवर्णसंधी

साधकांना सूचना आणि वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !

प्रयागराज कुंभपर्वासाठी तेथील स्वतःची वास्तू उपलब्ध करून देऊन धर्मकार्यात सहभागी व्हा !

‘१.१.२०१९ ते २८.२.२०१९ या काळात प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथे कुंभपर्व आहे. या काळात धर्मप्रसाराची सेवा करण्यासाठी भारतभरातील अनेक धर्मप्रेमी आणि साधक कुंभक्षेत्री वास्तव्याला असणार आहेत. त्यांच्या निवासाच्या दृष्टीने, तसेच विविध सेवांसाठी प्रयागमध्ये वास्तूची (घर, सदनिका (फ्लॅट), सभागृह (हॉल) यांची) आवश्यकता आहे.

जे साधक, वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी धर्मप्रसाराच्या सेवांकरता प्रयागमधील स्वतःची वास्तू विनामूल्य वापरण्यासाठी अथवा अल्प भाडे तत्त्वावर देऊ शकतात, त्यांनी कृपया कळवावे. प्रयागमधील झूंसी, अलोपीबाग, अल्लापूर, सोहबतिया बाग, ‘टागोर टाऊन’, ‘जोरगे टाऊन’ या भागात ही वास्तू असल्यास सुलभ होईल; परंतु या व्यतिरिक्त अन्य भागांमधील वास्तूही चालू शकेल.

कुंभपर्वात सेवेसाठी सुस्थितीतील दुचाकी आणि चारचाकी वाहनांची आवश्यकता !

‘१.१.२०१९ ते २८.२.२०१९ या काळात प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथे कुंभपर्व आहे. कुंभकाळात धर्मप्रसाराची सेवा करण्यासाठी भारतभरातील अनेक धर्मप्रेमी आणि साधक प्रयाग येथे वास्तव्याला असणार आहेत. या काळात कुंभक्षेत्री विविध सेवांसाठी दुचाकी आणि चारचाकी वाहनांची आवश्यकता आहे. ‘डिझेल’वर चालणारी आणि ४ – ५, तसेच ८ – १० व्यक्ती बसू शकतील, एवढ्या आसनक्षमतेची चारचाकी वाहने आणि शक्यतो ‘सेल्फ स्टार्ट’ असलेली दुचाकी वाहने आवश्यक आहेत.

साधक, वाचक, हितचिंतक वा धर्मप्रेमी यांच्याकडे सर्व कागदपत्रांची (आर्.सी बूक, पीयुसी, विमा (इन्शुरन्स) आदी) पूर्तता असलेली वरील प्रकारची वाहने असल्यास ते काही काळासाठी ती वापरायला देऊ शकतात. इच्छुकांनी खालील क्रमांकावर संपर्क करावा.

साधकांचे नातेवाईक अथवा परिचित प्रयाग येथे रहात असल्यास आणि ते त्यांचे वाहन कुंभसेवेसाठी वापरायला देऊ शकत असल्यास तसेही कळवावे.

धर्मप्रसारासाठी येणारे धर्मप्रेमी आणि साधक यांच्या भोजनासाठी धनरूपात साहाय्य करून पुण्यसंचयासह आध्यात्मिक लाभही मिळवा !

१. कुंभपर्वाचे महत्त्व

‘१.१.२०१९ ते २८.२.२०१९ या काळात प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथे कुंभपर्व आहे. या काळात संपूर्ण भारतभरातून ३ कोटी भाविक प्रयागराज येथे येतात. या काळात सर्व देवता, अनेक संत आदी प्रयागक्षेत्री उपस्थित असतात. या पर्वाच्या ठिकाणी आणि या काळात केलेल्या साधनेचे फळ अन्य स्थळकाळाच्या तुलनेने  १ सहस्र पटींनी अधिक मिळते.

२. धर्मप्रसार कार्यासाठी भारतभरातील १५० धर्मप्रेमी आणि साधक यांचे २ मास कुंभक्षेत्री वास्तव्य !

या काळात साधनेसाठी अधिकाधिक वेळ दिल्यास देवता आणि संत यांचा आशीर्वाद लाभून इच्छित कार्य अल्पावधीत पूर्णत्वाला जाते. या पुण्यकाळाचा साधनेसाठी लाभ करून घेऊन धर्मप्रसार कार्य सर्वत्र पोहोचवण्याच्या उद्देशाने भारतभरातील १५० धर्मप्रेमी आणि साधक सेवेसाठी कुंभक्षेत्री वास्तव्याला असणार आहेत. त्यांचा ६० दिवसांच्या (२ मासांच्या) कुंभकाळामध्ये अल्पाहार आणि भोजन यांसाठी येणारा व्यय खाली दिला आहे.

जे अर्पणदाते कुंभपर्वानिमित्त येणारे धर्मप्रेमी आणि साधक यांच्यासाठी अल्पाहार (न्याहारी) अन् भोजन यांकरता धनरूपात साहाय्य करून धर्मकार्यात सहभागी होऊ इच्छितात, त्यांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.

नाव आणि संपर्क क्रमांक

सौ. भाग्यश्री सावंत – ७०५८८८५६१०

संगणकीय पत्ता : [email protected]

टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *