Menu Close

श्री तुळजाभवानी मंदिरातील परंपरा पायदळी तुडवत पहिल्यांदाच महिलेकडून देवीच्या चरणांना स्पर्श !

  • हिंदूंच्या मंदिरांशी संबंधित परंपरा मोडणार्‍यांना ते मर्दुमकी गाजवण्यासारखे वाटत असले, तरी त्यांना धर्महानी केल्याचे महापाप धर्मशास्त्रानुसार भोगावेच लागते, हे लक्षात घ्या !
  • हे मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम आहेत ! हिंदूंच्या प्रथा-परंपरा सरकारीकरण झालेल्या मंदिरांमध्ये जपल्या जाणे शक्य नाही, हे यातून लक्षात येते. मंदिरांमधील प्रथा-परंपरा जपण्यासाठी आता मंदिरे भक्तांच्या स्वाधीन करणे आवश्यक आहे !

तुळजापूर : श्री तुळजाभवानी मंदिराच्या गाभार्‍यात जाऊन मंजुषा मगर या महिलेने ५ जानेवारीला रात्री देवीचे चरणस्पर्श करून पूजा केली. राज्याची कुलस्वामिनी मानल्या जाणार्‍या तुळजाभवानी मंदिराच्या गर्भगृहात जाऊन देवीला स्पर्श करण्याचा अधिकार विशिष्ट पुजारी सोडून इतरांना नाही; मात्र एका महिलेने ही परंपरा मोडीत काढल्याने श्रद्धाळू भक्तांमध्ये असंतोष पसरला आहे.

आतापर्यंत देवीच्या पायाला हात लावून दर्शन घेण्याची लिखित अनुमती नव्हती. या संदर्भात काही महिला जिल्हाधिकार्‍यांना जाऊन भेटल्या आणि त्यांनी ‘असे मंदिर संस्थांच्या कुठल्या अहवालात (रेकॉर्डमध्ये) किंवा नियमात हे आहे का ?’, याची विचारणा केली. ‘त्या संदर्भात नियम नाहीत’, हे लक्षात आल्यानंतर ५ जानेवारीला रात्री या महिला मंदिराच्या गर्भगृहात घुसल्या आणि देवीच्या चरणांना स्पर्श केला. (धर्मशास्त्राचे कुठलेही ज्ञान नसणारे प्रशासन धर्मशास्त्राशी संबंधित गोष्टींच्या संदर्भात कसे काय निर्णय घेते ? हिंदूंच्या मंदिरात कोणत्या प्रथा-परंपरा ठेवाव्यात आणि कोणत्या मोडाव्यात, हे प्रशासन ठरवणार का ? असे मोगलांच्या राज्यातही नव्हते ते आता घडत आहे, असेच यातून लक्षात येते. तसेच परंपरांशी संबंधित एखादी गोष्ट लिखित नाही, तर मोडायची, हा अधिकार या महिलांना कुणी दिला ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *