एम्आयएम् पक्ष सतत हिंदूविरोधी विधाने करत असल्याने घेतला निर्णय !
- ‘निधर्मी’ भारतात असे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार असणे म्हणजे ‘काळ्या ढगाला सोनेरी कड’ म्हणावी लागेल ! सिंह यांनी देशभरातील लोकप्रतिनिधींसमोर आदर्श ठेवला आहे !
- हिंदुत्वाविषयी सतत धरसोड वृत्ती असणारे भाजपचे नेते हे आमदार राजासिंह यांच्याकडून धर्माभिमान शिकतील का ?
भाग्यनगर (हैदराबाद) : तेलंगणमधील गोशामहल येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ तथा भाजपचे आमदार श्री. टी. राजासिंह यांनी राज्य विधानसभेचे हंगामी अध्यक्ष अहमद खान यांच्या उपस्थितीत सदस्यत्वाची शपथ घेण्यास नकार दिला. खान हे ‘मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन’ अर्थात् एम्आयएम् या धर्मांध पक्षाचे आमदार आहेत.
राज्य विधानसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी १७ जानेवारीला होणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून खान यांची नियुक्ती केली आहे. (हा चंद्रशेखर राव यांचा हिंदुद्वेष नव्हे का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) ‘मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या या निर्णयाचा फेरविचार करावा’, अशी मागणी श्री. सिंह यांनी केली.
Telangana: BJP MLA Raja Singh to not take oath in the state assembly in front of the pro-tem speaker who is from AIMIM. Says,”I don’t want to take oath in front of a protem speaker whose party wants to vanish Hindus. They never sing Vande Mataram & never say Bharat Mata ki Jai.” pic.twitter.com/1kAoUX5vz7
— ANI (@ANI) January 6, 2019
याविषयी त्यांनी प्रसारित केलेल्या एक चित्रफितीत म्हटले आहे, ‘‘एम्आयएम् हा पक्ष सात्याने हिंदुविरोधी विधाने करत असतो, तसेच तो ‘वन्दे मातरम्’ आणि ‘भारतमाता की जय’ म्हणण्यासही नकार देतो; म्हणूनच मी एम्आयएम्चे आमदार अहमद खान यांच्या उपस्थितीत शपथ घेणार नाही. मुख्यमंत्री चंद्रशेखर राव हे निजाम आणि एम्आयएम् यांचे प्रशंसक आहेत; म्हणूनच खान यांची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय रातोरात घेण्यात आला. खान यांच्या उपस्थितीत अन्य आमदार शपथ घेतील; पण मी घेणार नाही. माझ्या शपथग्रहणाविषयी मी अधिवक्त्यांचा सल्ला घेणार आहे. विधानसभेच्या नवीन अध्यक्षांच्या निवडीनंतर मी त्यांच्या दालनात जाऊन शपथ घेईन.’’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात