हिंदूंनो, आपल्यावरील संकटांवर मात करून हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संघटित व्हा ! – राष्ट्रीय कीर्तनकार श्री योगेश महाराज साळेगावकर
अमरावती : भारतमातेवर धर्मांतर, लव्ह जिहाद यांसारखी विविध संकटे आलेली आहेत. ती दूर करण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे काळाची आवश्यकता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे शत्रूंंवर विजय मिळवून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्याचप्रमाणे आता आपल्यावर आलेल्या संकटांवर मात करून हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी आपण संघटित व्हायला हवे. प्रत्येकाच्या मनामनात हिंदु राष्ट्राची ज्योत पेटली पाहिजे आणि युवकांनी प्रामुख्याने यासाठी सज्ज व्हायला हवे, असे मार्गदर्शन राष्ट्रीय कीर्तनकार श्री योगेश महाराज साळेगावकर यांनी केले. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ येथे ६ जानेवारी या दिवशी हिंदु जनजागृती समिती आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभा निर्विघ्नपणे पार पडली. त्या वेळी ते बोलत होते. सभेत हिंदु जनजागृती समितीचे विदर्भ समन्वयक श्री. श्रीकांत पिसोळकर, सनातन संस्थेचे श्री. हेमंत खत्री यांनीही मार्गदर्शन केले. समितीच्या कार्याची माहिती श्री. नीलेश टवलारे यांनी सांगितली, तर सूत्रसंचालन सौ. अनुभूती टवलारे यांनी केले. सभेला ७०० हिंदूंची उपस्थिती होती. ‘फेसबूक लाईव्ह’च्या माध्यमातून ५ सहस्र ६३७ जिज्ञासूंनी या सभेचा लाभ घेतला.
धर्मप्रेमींचे कृतीशील साहाय्य
१. सभेच्या आयोजनात नांदगाव पेठ येथील नवीन ८ ते १० धर्मप्रेमींनी कृतीशील सहभाग घेतला. सकाळी १० पर्यंत प्रसार करून नंतर नोकरीसाठी ते जायचे. रात्री १० वाजता परत आल्यावर उशिरापर्यंत प्रसार, संपर्क करणे, तसेच होर्डिंग लावणे या सेवा केल्या.
२. सभेसाठी घरोघरी प्रसार, प्रायोजक आणणे, उद्घोेषणेची गाडी पंचक्रोशीत फिरवणे, सभेची प्रत्यक्ष सिद्धता या सेवा धर्मप्रेमींनी उत्साहाने केल्या. त्यांच्या कुटुंबियांनी दोन दिवस अल्पाहार आणि भोजन व्यवस्था उपलब्ध करून दिली.