संयुक्त राष्ट्राकडेही साहाय्याची हाक
- गेल्या काही दिवसांपासून हिंदूंना हिंसक ठरवणारे अभिनेते नसरूद्दीन शाह आता त्यांच्या पंथातील या हिंसेविषयी गप्प का ?
- सातत्याने हिंदुविरोधी गरळओक करणारे पुरो(अधो)गामी, प्रसारमाध्यमे आणि तथाकथित महिला संघटना आता काही बोलत का नाहीत ?
बँकॉक : सौदी अरेबियातून पळालेल्या १८ वर्षीय तरुणीला बँकॉकच्या विमानतळावर कह्यात घेण्यात आले आहे. विमानतळ प्रशासनाने तिला परत पाठवण्याची सिद्धता चालू केली आहे. तथापि तिने सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे ‘कृपा करून मला सौदी अरेबियात परत पाठवू नका, मी इस्लाम पंथ सोडला आहे. कुटुंबियांच्या कठोर नियमांपासून मला सुटका हवी आहे. त्यांनी मला हिंसक वागणूक दिली असून मी एक महिला असल्याचा सन्मान ते करत नाहीत. अशात मला परत घरी पाठवल्यास माझे कुटुंबीय मला ठार मारतील’, अशी भीती व्यक्त केली. तिने समस्त जनतेकडे, तसेच संयुक्त राष्ट्राकडे साहाय्य करण्याची मागणी केली आहे. रहाफ महंमद एम् अल्कुनून असे तिचे नाव असून ती कुवैतमध्ये तिच्या कुटुंबियांसह सुट्टी घालवण्यासाठी गेली होती. तेथूनच तिने ऑस्ट्रेलियाला पसार होण्याचे ठरवले होते; परंतु तिला बँकॉकमध्ये कह्यात घेण्यात आले.
‘ह्युमन राइट्स वॉच’ने अल्कुनूनच्या मागणीची दखल घेत ‘तिला सौदी अरेबियात पाठवू नये’, असे आवाहन केले आहे. अरब देशांतील मानवाधिकार संघटनेच्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिला परत घरी पाठवल्यास तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जाईल.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात