Menu Close

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महाराष्ट्रात आंदोलने, महाआरती, श्रीरामनामाचा गजर

मुंबई : प्रभु श्रीराम म्हणजे कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान ! अयोध्यानगरीत राममंदिराच्या पुनर्निर्माणाचे स्वप्न प्रत्येकच हिंदू पहात आहे. राममंदिराच्या खटल्याची सुनावणी लवकरच चालू होणार आहे. आतापर्यंतच्या सर्वपक्षीय सरकारांनी राममंदिर उभारणीचे आश्‍वासन दिले; मात्र ते अद्याप पूर्ण झालेले नाही. अयोध्येत राममंदिराची उभारणी करावी, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समिती आणि विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने ९ आणि १० जानेवारीला ठिकठिकाणी आंदोलने, महाआरती, रामनामाचा गजर आणि पनवेल, कल्याण आणि नालासोपारा येथे नामदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी संपूर्ण महाराष्ट्र श्रीरामनामाच्या गजराने दुमदुमला. अनेकजण या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. ‘श्रीरामाच्या नामजपामुळेच राममंदिराची निर्मिती होणार आहे’, ही समस्त हिंदूंची, तसेच रामभक्तांची श्रद्धा दृढ झाली.

सोलापूर येथे राममंदिर उभारणीच्या मागणीसाठी समस्त हिंदूंचे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

राममंदिराविषयी हिंदूंना शौर्य दाखवण्यासाठी सरकारने भाग पाडू नये ! – अभय कुलथे, गोरक्षक सोलापूर

सोलापूर : अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत असलेल्या प्रभु श्रीरामाच्या मंदिराचा कायदा संसदेमध्ये तात्काळ पारित करून त्याचा केवळ शिलान्यास न करता ते मूर्त स्वरूपात लवकरात लवकर साकार करण्यासाठी सरकारने पावले उचलावीत, अशी भाजप सरकारला माझी विनंती आहे. वेळोवेळी हिंदूंच्या भावनांची पायमल्ली होते आणि आम्ही ती निमूटपणे सहन करतो. सनदशीर मार्गानेच हिंदू न्याय मागत आहेत. सरकारने आतापर्यंत कायद्याचे कारण पुढे करून चालढकलपणा केला. अन्य धार्मिक स्थळांना मात्र कायद्यात सवलत दिली जाते. भारत ही शूर-वीरांची भूमी आहे. हे शौर्य दाखवण्यासाठी सरकारने आम्हाला भाग पाडू नये. सनदशीर मार्गाने चाललेल्या आंदोलनाला तात्काळ न्याय द्यावा, अशी मागणी येथील गोरक्षक श्री. अभय कुलथे यांनी केली.

सरकारने तात्काळ कायदा करून राममंदिर बांधावे या मागणीसाठी येथील जिल्हा परिषद मुख्य प्रवेशद्वार येथे हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना निवेदन देण्यात आले.

या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे, श्री. विनोद रसाळ, सनातन संस्थेच्या सौ. अनिता बुणगे यांनीही मनोगत व्यक्त केले. या वेळी ‘सियावर रामचंद्र की जय, बजरंगबली हनुमान की जय’, ‘प्रभु श्रीरामचंद्रांचा विजय असो’, ‘घर घर भगवा छायेगा रामराज्य फीर आऐगा’ या घोषणा देण्यात आल्या.

सरकारने तात्काळ कायदा करून राममंदिर उभारावे ! – राजन बुणगे, हिंदु जनजागृती समिती

वर्ष २०१० मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने या प्रकरणी ‘श्रीरामजन्मभूमी ही श्रीरामाचीच आहे’ असे शिक्कामोर्तबही केले. गेली आठ वर्षे हा वाद सर्वोच्च न्यायालयात पडून आहे. लोकशाहीचा आधारस्तंभ असलेली आमची न्यायव्यवस्था ‘श्रीराममंदिर हा आमच्या प्राधान्यात नाही’ असे म्हणते. त्यामुळे हिंदूंनी राममंदिरासाठी आणखी किती काळ वाट पहायची ?, असा प्रश्‍न आहे. केंद्रात आणि उत्तरप्रदेश या राज्यांत दोन्ही ठिकाणी भाजपचेच पूर्ण बहुमतातील शासन आहे. त्यामुळे राममंदिर उभारणीसाठी संसदेत तात्काळ कायदा बनवून अयोध्येत भव्य राममंदिर उभारावे.

विशेष : आंदोलन पाहून ७१ वर्षांच्या आजीही आंदोलनात सहभागी झाल्या.

सोलापूर येथील आंदोलनात उपस्थित मान्यवर

या वेळी सर्वश्री कृष्णहरी पंतुलू, मधुसूदन मेरगू, प्रतीक्षित परदेशी, जंबय्या काकी, संशोधन न्यारम, गणेश स्वामी, यशपाल चितापुरे, सिद्धराम नंदर्गी यांसह १०० हून अधिक धर्मप्रेमी आंदोलनात सहभागी झाले होते.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *