गोवा : राममंदिर उभारणीत येत असलेले विविध अडथळे दूर व्हावेत, सरकारला राममंदिर उभारण्यासाठी अध्यादेश काढण्यासाठी बळ मिळावे, यासाठी खडपाबांध, फोंडा येथील विश्व हिंदु परिषद सभागृहात शिवयोद्धा संघटना आणि हिंदु जनजागृती समिती यांनी श्रीरामनामाचा गजर केला, तर जुना बाजार, मडगाव येथील श्रीराम मंदिरात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्रीरामनामाचा गजर करण्यात आला. फोंडा येथे उपस्थितांनी हिंदूंना धर्मशिक्षण मिळावे, यासाठी फोंडा येथे धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याचा निर्धार केला.
१. खडपाबांध, फोंडा येथील विश्व हिंदु परिषद सभागृहात शिवयोद्धा संघटना आणि हिंदु जनजागृती समिती यांचे कार्यकर्ते श्रीरामनामाचा गजर करतांना
२. मडगाव येथील श्रीराम मंदिरात श्रीरामनामाचा गजर करतांना हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते