Menu Close

हंगामी अध्यक्षपदी एम्आयएम् पक्षाचे खान यांच्या नियुक्तीचे तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांकडून समर्थन

अल्पसंख्यांकांवर सवलतींचा वर्षाव करणार्‍या तेलंगण सरकारकडून दुसरे अपेक्षित तरी काय असणार ?

भाग्यनगर : विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी एम्आयएम् पक्षाचे अहमद खान यांच्या नियुक्तीवरून वाद निर्माण झाला असला, तरी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी या नियुक्तीचे समर्थन केले आहे.

तेलंगणमधील गोशामहल मतदारसंघाचे भाजपचे आमदार तथा प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. टी. राजासिंह यांनी अहमद खान यांच्या अध्यक्षतेखाली शपथ घेण्यास नकार दिला होता. ‘एम्आयएम्’ पक्षाने सातत्याने हिंदुविरोधी विधाने केली आहेत. तसेच हा पक्ष ‘वन्दे मातरम्’ आणि ‘भारतमाता की जय’ म्हणण्यासही नकार देतो. त्यामुळे मी अशा पक्षाच्या आमदारासमोर शपथ घेणार नाही. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करावा’, असे श्री. टी. राजासिंह यांनी ठणकावून सांगितले; मात्र मुख्यमंत्र्यांनी खान यांची हंगामी सभापतीपदी केलेली नियुक्ती ‘गंगा जमुनी तेहझीब’ या संस्कृतीशी सुसंगत असल्याचे सांगून या नियुक्तीचे समर्थन केले. तेलंगण विधानसभेतील सर्व नवनिर्वाचित आमदारांचा १७ जानेवारीला शपथविधी होणार आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *