‘पूर्वीच्या काळी हिंदु राजांच्या दरबारामध्ये राजगुरु असत. ते धर्मशास्त्र, न्यायशास्त्र, अर्थशास्त्र, युद्धशास्त्र अशा सर्वच विषयांत प्रवीण असलेले आचार्य असत. ते राजाला राज्याच्या संदर्भातील सर्व विषयांत योग्य समादेश (सल्ला) देत. त्यामुळे कधीही कोणावरही अन्याय होत नसे. याउलट आज निधर्मी भारतीय लोकशाहीतील न्यायव्यवस्थेतील न्यायाधिशांचे शिक्षण हे ब्रिटीशकालीन न्यायशिक्षणानुसार झालेले असल्याने त्यांना राजगुरूंप्रमाणे सर्वच क्षेत्रांतील ठाऊक नसते. यामुळेच ‘केरळमधील ‘शबरीमला देवस्थाना’त जाऊन दर्शन घेण्याचा अधिकार सर्वच वयोगटांतील महिलांना आहे’, हा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल देवस्थानाच्या शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या धार्मिक परंपरांवर आघात करणारा आणि त्यामुळे कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारा ठरला. याचे कारण म्हणजे, सध्याची ब्रिटीशकालीन न्यायव्यवस्थाच त्रुटीयुक्त आहे. ती पालटून प्राचीन काळापासून चालत आलेली हिंदूंची न्यायव्यवस्थाच अमलात आणणे, हे देशाच्या सर्वंकष हितासाठी आवश्यक आहे. यासाठी ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला पर्याय नाही’, हे ओळखून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी एकवटून प्रयत्न करूया !’
– (पू.) श्री. संदीप आळशी (१०.१.२०१९)