Menu Close

‘चीट इंडिया’ चित्रपटाच्या ‘पोस्टर’मध्ये हिंदूंच्या देवतांची चित्रे अवमानकारकरित्या दाखवली !

‘सेन्सॉर बोर्डा’च्या आक्षेपानंतर चित्रपटाचे नाव आणि ‘पोस्टर’ यांमध्ये पालट !

अन्य पंथियांच्या श्रद्धास्थानांना अवमानकारकरित्या दाखवण्याचे धाडस चित्रपट निर्माते कधी करतात का ? कारण त्यामुळे काय ‘गहजब’ होईल, हे चित्रपटाचे निर्माते जाणून असतात. हिंदू सहिष्णु आहेत; म्हणूनच सर्व माध्यमांतून देवतांचे विडंबन सर्रास चालू आहे ! हिंदूंमध्ये धर्माभिमान जागृत होण्यासाठी त्यांना धर्मशिक्षण देणारे हिंदु राष्ट्रच हवे !

मुंबई : ‘पोस्टर’मध्ये हिंदूंच्या देवतांची चित्रे अवमानकारकरित्या दाखवण्यात आलेल्या ‘चीट इंडिया’ या चित्रपटाचे नाव पालटून ‘व्हाय चीट इंडिया’, असे करण्यात आले आहे. ‘चीट इंडिया’ हे नाव दिशाभूल करणारे असल्याचा आक्षेप केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने (सेन्सॉर बोर्डाने) घेतल्यानंतर हा पालट करण्यात आला. यासह या चित्रपटाचे आक्षेपार्ह ‘पोस्टर’ही पालटण्यात आले आहे.

(टीप : वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नसून विडंबन कसे असते हे समजण्यासाठी ते प्रसिद्ध करत आहोत.)

या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये अभिनेता इमरान हाश्मी एका कार्यालयात खुर्चीवर बसून पुढच्या व्यक्तीला नमस्कार करतांना दाखवण्यात आले आहेत. त्याच्या कपाळाला टिळा असल्याचे दाखवण्यात आले आहे. तसेच कार्यालयाच्या भिंतींवर भगवान शिव, श्री महालक्ष्मीदेवी, श्री सरस्वतीदेवी यांसह हिंदूंच्या अन्य देवतांची ठळकपणे चित्रे दाखवण्यात आली आहेत. त्यामध्ये श्री सरस्वतीदेवीचे चित्र असलेल्या भिंतीवरील कपाटातून नोटा बाहेर पडतांना दाखवण्यात आल्या आहेत. चित्रपटाच्या या पोस्टरमधून अभिनेता धार्मिक हिंदु दाखवण्यात आला असून त्याने भ्रष्ट मार्गाने संपत्ती गोळा केली असल्याचे ध्वनित होत आहे. देशातील शिक्षणव्यवस्थेमधील भ्रष्टाचार या चित्रपटातून दाखवण्यात आला आहे. अभिनेता इमरान हाश्मी बसलेल्या ठिकाणी पटलावर नोटांनी भरलेली बॅग दाखवण्यात आली आहे, तसेच भारताचा राष्ट्रध्वजही छोट्या आकारात दाखवण्यात आला आहे. या पोस्टरमधून, तसेच चित्रपटाच्या नावावरून भारत भ्रष्टाचारग्रस्त असल्याचे ध्वनित होत आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *