Menu Close

भाईंदर आणि मालाड येथे झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात राममंदिर उभारणीची मागणी

सरकारने तात्काळ कायदा करून अयोध्या येथे भव्य राममंदिर उभारावे ! : भाईंदर (ठाणे) आणि मालाड (मुंबई) येथे झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात हिंदूंची एकमुखी मागणी

मुंबई : कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेली अयोध्यानगरी ही प्रभु श्रीरामाची जन्मभूमी आहे, हे ऐतिहासिक सत्य आहे. हिंदूंच्या धर्मग्रंथांमध्ये याचे अनेक पुरावे आहेत. न्यायालयात पुरातत्वीय पुराव्यांच्या आधारे पुन्हा सिद्ध झाले आणि वर्ष २०१० मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने या प्रकरणी ‘श्रीरामजन्मभूमी ही श्रीरामाचीच आहे’ असे शिक्कामोर्तबही केले. गेली आठ वर्षे आता हा वाद सर्वोच्च न्यायालयात पडून आहे. त्यामुळे हिंदूंनी राममंदिरासाठी आणखी किती काळ वाट पहायची ? केंद्रात आणि उत्तरप्रदेश राज्यात दोन्ही ठिकाणी भाजपचेच पूर्ण बहुमतातील शासन आहे. त्यामुळे संसदेत तात्काळ कायदा बनवून अयोध्येत भव्य राममंदिर उभारावे, अशी मागणी भाईंदर (जिल्हा ठाणे) येथे १२ जानेवारी आणि मालाड येथे १३ जानेवारी या दिवशी झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात सहभागी झालेल्या हिंदुत्वनिष्ठांकडून करण्यात आली. आंदोलनाच्या ठिकाणी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. याला शेकडो रामभक्तांचा चांगला प्रतिसाद लाभला.

आंदोलनात करण्यात आलेल्या अन्य मागण्या

  • केंद्रशासनाने हिंदूंना हिंदु धर्मग्रंथांचे शिक्षण सर्व शाळा-महाविद्यालये यांमधून प्रतिदिन द्यावे.
  • तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी मद्य-मांस यांच्या विक्रीवर बंदी घालावी, तसेच मंदिरांचे सरकारीकरण रहित करून मंदिरे पुन्हा भक्तांच्या कह्यात द्यावीत.
  • हनुमानाला मुसलमान, जाट, चिनी, खेळाडू आदी म्हणणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. यासाठी हिंदु धर्म, धर्मग्रंथ, देवता आणि संत यांचा अनादर रोखणारा कठोर कायदा करावा.

मालाड

१३ जानेवारी या दिवशी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत शिवाजी चौक, टॅन्क लेन, मालाड (पू.) येथे झालेल्या आंदोलनात राष्ट्रीय बजरंग दल, योग वेदांत समिती, बजरंग शक्ती, हिंदु राष्ट्र सेना, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती या संघटना तसेच भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी झाले होते.

भाईंदर

१२ जानेवारी या दिवशी सायंकाळी ५.३० ते ७.०० या वेळेत भाईंदर (प.) रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या आंदोलनात विश्‍व हिंदु सेवा संघ, बजरंग दल, शककर्ते शिवराज सेवा संस्था, वर्गमित्र, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती या संघटना तसेच हिंदुस्तान नॅशनल पार्टी या पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी झाले होते.

‘आंदोलनात घोषणा देऊ नका’, असे सांगणारे भाईंदर येथील पोलीस !

भाईंदर (प.) येथे आंदोलन चालू असतांना सहभागी हिंदुत्वनिष्ठ उत्स्फूर्तपणे प्रभु श्रीरामांविषयी आणि अन्य विषयावर घोषणा देत होते. या वेळी आंदोलनस्थळी येऊन पोलिसांनी सांगितले, ‘‘तुम्ही केवळ लोकांना स्वाक्षरी मोहिमेचे आवाहन करा. या घोषणा देऊ नका.’’ यावर आंदोलनात सहभागी हिंदुत्वनिष्ठांनी ‘ज्या विषयावर आंदोलन आहे, त्या विषयावर आम्ही घोषणा देणार’, असे पोलिसांना ठामपणे सांगितले. आंदोलन संपेपर्यंत सर्वांनी स्वाक्षरी मोहिमेचे आवाहन करण्यासह उत्स्फूर्तपणे घोषणाही दिल्या. (सनदशीर मार्गाने आंदोलन करणार्‍यांना घोषणा देण्यापासून रोखणारे पोलीस ! न्यायालयाचा आदेश उल्लंघून ध्वनीप्रदूषण करणार्‍या मशिदींवरील भोंग्यांविषयी पोलिसांनी कधी जाब विचारला आहे का ? केवळ हिंदूंच्याच संदर्भात आक्षेप घेतला जातो, हा पोलिसांचा धार्मिक भेदभाव नव्हे काय ? हिंदू असंघटित असल्याचाच हा परिणाम आहे !  – संपादक)

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *