कायद्याच्या रूपाने ‘सर्जिकल स्ट्राइक’ करून हिंदु धर्मावर आलेले हे धर्मांतराचे संकट दूर करावे लागेल ! – मनोज लासी, नगरसेवक, भाजप
उल्हासनगर (जिल्हा ठाणे) : आपल्या देशात ६ राज्यांत धर्मांतरबंदी कायदा लागू आहे, त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही असाच कायदा त्वरित लागू करावा ही या फेरीच्या अनुषंगाने समस्त सिंधी समाजाची मागणी आहे. ज्याप्रमाणे सर्जिकल स्ट्राइक करून देशावर आलेले संकट दूर झाले, त्याचप्रमाणे हिंदु धर्मावर आलेले हे धर्मांतरांचे संकट दूर करावे लागेल. हिंदु जनजागृती समितीने सर्व संघटनांना एकत्र आणत धर्मांतराच्या विरोधात उभारलेल्या या चळवळीत सर्वांनी सहभागी होऊन आपले धर्मकर्तव्य बजावावे, असे ठाम प्रतिपादन भाजपचे नगरसेवक श्री. मनोज लासी यांनी केले. धर्मांतर बंदी कायदा महाराष्ट्रात झाला पाहिजे, या मागणीसाठी उल्हासनगर येथील हिंदूंनी काढलेल्या मोर्च्यात ते बोलत होते.
विविध प्रलोभने दाखवून धर्मांतर करण्याच्या ख्रिस्ती मिशनर्यांच्या कारवाया महाराष्ट्रात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. कोट्यधिशांपासून ते गरीब हिंदूंपर्यंत अनेकांच्या असाहाय्यतेचा आणि त्रस्तपणाचा अपलाभ उठवून अन् त्यांना आमिषे दाखवून ख्रिस्ती मिशनर्यांनी आतापर्यंत ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथील १ लाखांहून अधिक सिंधी आणि अन्य समाजांतील हिंदू यांचे धर्मांतर केले आहे. दिवसेंदिवस वाढत जाणार्या धर्मांतराच्या भस्मासुराविरुद्ध एकत्र येऊन ख्रिस्ती मिशनर्यांना रोखण्याचा एकमुखी निर्धार करत १४ जानेवारीला उल्हासनगर येथे मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात सहभागी संत, हिंदु जनजागृती समितीसह विविध संघटनांचे पदाधिकारी, राजकीय पक्षांचे नगरसेवक आणि हिंदु धर्माभिमानी यांनी ‘इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही धर्मांतर बंदी कायदा लागू करावा’, अशी एकमुखी मागणी केली.
उपस्थिती
संत : पू. साई परमानंदजी, साई वसनशाह दरबार, पू. साई लीलारामजी, झुलेलाल मंदिर, पू. टोनी साई, गुरु गुलराज कुटीया, पू. टिल्लू सिंगजी, थार्यासिंग दरबार
मान्यवर : शिवसेनेचे शहरप्रमुख आणि नगरसेवक श्री. राजेंद्र चौधरी, भाजपचे नगरसेवक श्री. मनोज लासी, शिवसेनेचे नगरसेवक श्री. दिलीप गायकवाड, ह.भ.प. रामदास चौधरी, श्री. ढालू नाथानी, श्री. गजानन शेळके, श्री. मनोज साधवानी, श्री. चंदन त्रिलोकानी, अधिवक्ता राहुल चतुर्वेदी, श्री. प्रकाश तलरेजा, श्री. कमलेश ताराचंदानी, श्री. निखिल गोळे, श्रीमती सिंधु शर्मा
पक्ष : भारतीय जनता पक्ष, शिवसेना, साई पक्ष
धार्मिक संघटना : आसारामजी संप्रदाय, भाऊ परशुराम झुलेलाल मंडळी, जय झुलेलाल सोशल ग्रुप, जय झुलेलाल संघर्ष सेवा समिती आणि सनातन संस्था
हिंदुत्वनिष्ट संघटना : हिंदु राष्ट्र सेना, राष्ट्रीय छावा संघटना, सिंधु युवा संघटना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, सिंधी कौन्सिल ऑफ इंडिया, हिंदु जनजागृती समिती
मोर्च्यात करण्यात आलेल्या मागण्या !
१. महाराष्ट्रामध्ये धर्मांतर बंदी कायदा लागू करावा !
२. उल्हासनगरमध्ये होत असलेल्या धर्मांतराच्या विरोधात कठोर कारवाई व्हावी !
३. धर्मांतरासाठी विदेशातून येणार्या पैशांची चौकशी व्हावी !
४. विठ्ठलवाडी येथे चर्चमध्ये झालेल्या बलात्काराची चौकशी व्हावी !
५. अनधिकृत प्रार्थनास्थळे आणि प्रार्थना सभा यांवर कारवाई व्हावी !