कायदाद्रोही कृत्य करणार्या तृप्ती देसाई !
पुणे : भूमाता या संस्थेची स्थापना डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी केली आहे. तृप्ती देसाई यांनी डॉ. मुळीक यांची अनुमती न घेता संघटनेच्या नावाचा वापर केला आहे. त्या विरोधात आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत, अशी चेतावणी भूमाता महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा दुर्गा शुक्रे आणि संघटक अधिवक्ता कमल सावंत यांनी एका पत्रकार परिषदेत दिली.
दुर्गा शुक्रे पुढे म्हणाल्या, देसाई यांनी प्रसिद्धीच्या हव्यासापोटी महाशिवरात्रीच्या दिवशी त्र्यंबकेश्वर येथे आंदोलन केले. कोणाच्याही धार्मिक भावना न दुखावता महिलांना समानतेचा अधिकार मिळावा, ही आमची मागणी आहे. श्री शनिशिंगणापूर येथे श्री शनिदेवाच्या चौथर्यावर महिलांना प्रवेश देण्यात यावा, यासाठी ग्रामस्थ आणि विश्वस्त यांच्याशी चर्चा केली जाणार आहे. त्यासाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात येणार आहे. महिलांना समानतेचा हक्क मिळावा; म्हणून न्यायालयातही जनहित याचिका प्रविष्ट करण्यात येणार आहे. (देशासमोर अनेक ज्वलंत प्रश्न असतांना श्री शनिदेवाच्या चौथर्यावर चढणे, त्र्यंबकेश्वर येथील मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करणे, अशा गोष्टींना प्राधान्य देऊन बुद्धीप्रामाण्यवादी स्त्रिया स्वतःचेच हसे करून घेत आहेत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात