Menu Close

(म्हणे) ‘मुसलमानांनाही १० टक्के आरक्षण द्या !’ – मायावती

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षण देण्याची तरतूद केवळ १० वर्षांसाठी केली होती. आज ७१ वर्षे उलटून गेली, तरी आरक्षण कायम राहिले आहे. डॉ. बाबासाहेबांच्या भूमिकेतून आरक्षण संपवायला हवे !
  • उभी हयात अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करण्यात घालवणार्‍या अशा नेत्यांकडून दुसरी अपेक्षा तरी काय ठेवणार ?

लक्ष्मणपुरी (लखनौ) : केंद्र सरकारने नुकतेच सर्वसाधारण वर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना शिक्षण आणि सरकारी नोकरी यांत १० टक्के आरक्षण देण्याचा कायदा केला. या कायद्यास बहुजन समाज पक्षानेही पाठिंबा दिला. तथापि मुसलमानांमध्येही रोजगाराची समस्या असून त्यांनाही सरकारने १० टक्के आरक्षण द्यावे, अशी मागणी बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा तथा उत्तरप्रदेश राज्याच्या माजी मुख्यमंत्री श्रीमती मायावती यांनी केली. त्यांच्या ६३ व्या वाढदिवसानिमित्त त्या बोलत होत्या. मायावती पुढे म्हणाल्या, ‘‘स्वातंत्र्यानंतर सरकारी नोकर्‍यांत ३३ टक्के मुसलमान होते; आता ही संख्या २-३ टक्के इतकी आहे. मुसलमानांना बागेमध्ये नमाजपठण करण्यास प्रशासनाकडून बंदी का घातली गेली ? (सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे जागा अडवून चालू असलेल्या नमाजपठणामुळे लोकांना त्रास होत होता. त्याची नोंद घेऊन त्यावर बंदी घालण्यात आली; मात्र मुसलमानप्रेमामुळे आंधळ्या झालेल्या मायावतींना मुसलमानांव्यतिरिक्त अन्यांच्या अडचणी दिसत नाहीत, हेच खरे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) उत्तरप्रदेशमध्ये उघड्यावर नमाजपठणास बंदी घालण्यात आली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर त्या बोलत होत्या. बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्ष यांची युती झाल्यामुळे भाजपची झोप उडाली आहे. देशावर सर्वाधिक काळ राज्य करणार्‍या काँग्रेसलाही आम्ही निवडणुकीत धडा शिकवू. राज्यातील गरीब, मागास आणि अल्पसंख्य समाजाचा आम्हालाच पाठिंबा मिळेल.’’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *