Menu Close

राजस्थान येथील हिंदु युुवतीला ‘ब्लॅकमेल’ करून तिचे धर्मांधाकडून अपहरण

  • धर्मांधाने युवतीची अश्‍लील छायाचित्रे काढून तिला घर सोडण्यास भाग पाडले !
  • गोमांस खाण्यासाठी, नमाज पठणासाठी आणि धर्मांतर करण्यासाठी दबाव
  • ‘लव्ह जिहाद’च्या प्रकरणी युवतीच्या कुटुंबियांकडून पोलीस ठाण्यात तक्रार

सैनिक ‘हनीट्रॅप’ मध्ये, तर हिंदु युवती ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात अडकत आहेत. त्यामुळे ‘भारतमाता’ आणि भारतातील ‘माता’ यांना धर्मांधांच्या तावडीतून सोडवण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे अपरिहार्य !

बारमेर (राजस्थान) : येथील एका १८ वर्षांच्या युवतीचे श्रीनगरच्या कुपवाडा येथील धर्मांध गुलजार याने ९ मासांपूर्वी अपहरण केले. गुलजार याने अश्‍लील छायाचित्राद्वारे धमकावून तिला घर सोडण्यास भाग पाडले होते. तिची दुबई येथे विक्री करण्यात येणार असल्याचे लक्षात आल्यावर युवतीने त्याच्या तावडीतून पळ काढला. घरी परतल्यावर धर्मांधाने तिच्यावर गोमांस खाण्यासाठी आणि नमाज पठणासाठी दबाव आणल्याचे तिने सांगितले. ‘लव्ह जिहाद’ प्रकरणी युवतीच्या कुटुंबियांकडून पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

१. बारमेर येथील एका उपाहारगृहात काम करणार्‍या गुलजार याने युवतीची अश्‍लील छायाचित्रे काढली होती. याद्वारे गुलजार याने तिला ‘ब्लॅकमेल’ करत धमकी देऊन  जम्मू-काश्मीर येथे बोलावले. युवतीही घाबरून जम्मू-काश्मीर येथे गेली. जम्मू-काश्मीर येथे गुलजार याने युवतीसह निकाह केल्याची खोटी कागदपत्रे सिद्ध केली. दरम्यान युवती गुलजार याच्या घरात होती. तेथे गुलजार याच्या कुटुंबातील पुरुषही तिच्यावर डोळा ठेवून होते.

२. या संदर्भात युवतीच्या पालकांनी बारमेर पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार केली होती. पोलीस श्रीनगर येेथे युवतीच्या चौकशीसाठी गेले असता काश्मीर पोलिसात कार्यरत असलेला गुलजार याच्या भावाने युवतीची आणि बारमेर पोलिसांची भेट होऊ दिली नाही, तसेच पोलिसांना खोटा जबाब न दिल्यास तिला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे युवती आणि बारमेर पोलीस यांची गुलजार याच्या घरी भेट झाल्यावर तिने भीतीपोटी स्वखुशीने गुलजारसमवेत रहात असल्याचे सांगितले.

३. काही दिवसांनी युवतीला तिची दुबई येथे विक्री होणार असल्याचे कळल्यावर तिने १ मासापूर्वी श्रीनगर येथून पळ काढला आणि बारमेर येथे आल्यावर तिच्या कुटुंबियांना संपर्क करून झालेल्या प्रकाराची माहिती दिली. कुटुंबियांनी गुलजार याच्यावर ‘लव्ह जिहाद’चा गंभीर आरोप करत निकाहाच्या कागदपत्रांना न्यायालयात आवाहन दिले आहे.

४. पीडित युवतीच्या वडिलांनी म्हटले आहे की, माझ्या मुलीच्या जिवाला धोका आहे. धमकी देऊन निकाहाची कागदपत्रे बनवण्यात आली आहेत. कोणतीही युवती ‘लव्ह जिहाद’ची शिकार होण्यापासून वाचण्यासाठी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होऊन दोषींना शिक्षा झाली पाहिजे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *