उकणी (जिल्हा यवतमाळ) : येथील हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १४ जानेवारीला उकणी या गावातील शिव मंदिराच्या सभागृहात हिंदु-राष्ट्र जागृती सभा चैतन्यदायी आणि उत्साही वातावरणात पार पडली. सभेचा आरंभ वक्त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आला. वक्त्यांचा सत्कार गावातील ज्येष्ठ नागरिक-शिक्षक श्री. नितगुरुजी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. सभेचा लाभ सभागृहात ८० जणांनी, तर सभागृहाबाहेर ध्वनीक्षेपकावरून २५ जणांनी घेतला.
‘साधना आणि हिंदु-राष्ट्र स्थापनेची आवश्यकता’ हा विषय मांडतांना समितीचे श्री. लहू खामणकर म्हणाले, ‘‘साधना करत धर्मकार्यात सहभागी झालो, तर देवाची कृपा निश्चितच होईल.’’
सभेच्या यशस्वितेसाठी गावातील सर्वश्री नथ्थूजी खाडे, चिंतामण रणदिवे, रामचंद्र खाडे, ताराचंद राजपूत, प्रभाकर लोडे, सोमेश्वर ढपकस, एकनाथजी बोंडे यांनी प्रयत्न केले.
क्षणचित्रे
१. पंधरवाडी येथे धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याचे नियोजन करण्यात आले.
२. सभेपूर्वी गावात फेरी काढल्याने वातावरण चैतन्यमय झाले.
yar waha to bjp ki hai fir bhi…………….kaha gaye RSS aur hinduwadi sangathan jo bjp ko vote dene ke liye kahte hai
Yes