- हे साडेचार वर्षांनी लक्षात आले, हे अधिक चिंताजनक ! हिंदूंना धर्मांतरित करणार्या ख्रिस्त्यांचा धूर्तपणा ओळखायला इतका वेळ का लागतो ? हिंदूंचे धर्मांतर रोखायला किती वेळ लागेल ?
- ‘बहुसंख्यांकांनी मागणी करूनही गेल्या साडेचार वर्षांत धर्मांतरबंदी कायदा का झाला नाही ?’, या उत्तराच्या प्रतीक्षेत हिंदू आहेत !
- आतापर्यंतच्या सरकारांनी केलेल्या दुर्लक्षामुळे ईशान्येकडील राज्ये, तसेच देशातील काही भाग ख्रिस्तीबहुल बनले आहेत. मिझोराममधील मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी तर बायबलमधील पंक्तींचे उच्चारण करून पार पडला. असेच चालू राहिले, तर काही वर्षांत अर्धाअधिक भारत ख्रिस्तमय होईल, तर हिंदू अल्पसंख्य ! हिंदूंनो, असे होऊ द्यायचे नसेल, तर आताच हिंदु राष्ट्राची स्थापना करा !
नवी देहली : ब्रिटन आणि अमेरिका येथील अल्पसंख्यांक समुदाय तेथे धर्मांतरबंदी कायदा करण्याची सतत मागणी करत असतो; मात्र भारतात बहुसंख्य असलेल्या समाजालाच धर्मांतरबंदी कायदा करण्याची मागणी करावी लागते, हे चिंताजनक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केले. शहरातील विज्ञान भवन येथे ‘राष्ट्रीय ख्रिस्ती महासंघा’ने आयोजित केलेल्या ‘फेस्टिव्हल ऑफ पीस’ या कार्यक्रमात ते बोलत होते. ‘देशात मोठ्या प्रमाणात होणार्या धर्मांतराची चौकशी झाली पाहिजे’, असेही त्यांनी सांगितले.
सिंह पुढे म्हणाले, ‘‘ख्रिस्ती समाजानेही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, कोणी स्वेच्छेने परधर्म स्वीकारला, तर कोणाला अडचण असू नये. तथापि मोठ्या प्रमाणात केले जाणारे धर्मांतर कोणत्याही देशासाठी चिंतेचा विषय आहे. तुम्ही जर हिंदु धर्मीय असाल, तर हिंदु रहा, मुसलमान असाल, तर मुसलमान रहा, ख्रिस्ती असाल, तर ख्रिस्ती रहा; पण तुम्ही सर्व जगाचे धर्मांतर करण्याची इच्छा का बाळगता ? तुम्हाला कोणावर राज्य करायचे आहे का ? मी कुठल्याही धर्माचे पालन करण्यासाठी असलेल्या स्वातंत्र्याचे समर्थन करतो; परंतु मोठ्या प्रमाणात होणारे धर्मांतर हा देशासाठी चिंतेचा विषय असल्याने धर्मांतराच्या विषयावर समाजात व्यापक चर्चा होण्याची आवश्यकता आहे. आमचे सरकारसुद्धा कोणाशीही भेदभावाने वागत नाही. मी माझ्या जीवनात कधीही जात, पंथ आणि धर्म यांच्या आधारे भेदभाव केलेला नाही. सरकार बनवू अथवा न बनवू, आपण जिंकू किंवा हरू; परंतु कोणाशीही भेदभावाने वागता कामा नये.’’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात