भांडुप (मुंबई) : श्रीरामजन्मभूमी अयोध्येत भव्य राममंदिर उभारण्यासाठी सरकारने अध्यादेश काढावा, या अनुषंगाने हिंदु जनजागृती समितीच्या ‘रामनामाचा गजर’ या मोहिमेच्या अंतर्गत १२ जानेवारी या दिवशी सायंकाळी ६.३० वाजता हनुमान मंदिर, गावदेवी मार्ग, भांडुप पश्चिम येथे सामूहिक नामजप करण्यात आला. या वेळी भाजपचे भांडुप विधानसभा अध्यक्ष श्री. राजेश गोलपकर, श्रीकृष्ण मंदिराचे पुजारी श्री. विजय ठोंबरे, शिवसेना कणकवली संपर्कप्रमुख श्री. संदेश घाडीगावकर, हनुमान मंदिराचे पुजारी श्री. सीताशरणजी या मान्यवरांसह हिंदु जनजागृती समितीचे आणि श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे कार्यकर्ते उपस्थित होते. राममंदिर उभारण्यासाठी सरकारला देण्यात येणार्या निवेदनावर या वेळी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली.
राममंदिराच्या उभारणीसाठी भांडुप येथे ‘रामनामाचा गजर’ !
Tags : Hindu Janajagruti SamitiHindu Organisationsभाजपभाजपामंदिरे वाचवारामजन्मभूमीशिवप्रतिष्ठानशिवसेनाहिंदूंच्या समस्या