हिंदूंवरील अत्याचार रोखण्यासाठी हिंदु राष्ट्र स्थापन केल्याविना पर्याय नाही ! – डॉ. नरेंद्र पाटील, हिंदु जनजागृती समिती
नंदुरबार : भारतामध्ये प्रतिदिन सहस्रो गोवंशाची हत्या होत आहे. प्रतिवर्षी सहस्रो हिंदु तरुणी लव्ह जिहादच्या आमिषाला बळी पडून धर्मांतरित होत आहेत. आज मंदिरांचे सरकारीकरण होऊन भक्तांचा पैसा उधळला जात आहे. हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या होत आहेत. हिंदूंवरील अत्याचार रोखण्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र स्थापन करणे, हाच एकमेव पर्याय आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे डॉ. नरेंद्र पाटील यांनी केले. ते दहिन्दुले येथे नुकत्याच झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत बोलत होते. सभेला १०८ धर्माभिमानी ग्रामस्थ उपस्थित होते.
या वेळी सनातन संस्थेचे डॉ. सतीश बागुल यांनी ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी धर्माचरणाचे महत्त्व’ या विषयावर मार्गदर्शन केले. दीपप्रज्वलन करून तसेच वीरशिरोमणी महाराणा प्रतापसिंह, छत्रपती शिवाजी महाराज, वीर एकलव्य यांच्या प्रतिमेला माल्यार्पण आणि अभिवादन करून सभेला प्रारंभ करण्यात आला. श्री. आकाश गावित यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची ओळख करून दिली, तर सूत्रसंचालन श्री. जितेंद्र मराठे यांनी केले. गावातील २० हून अधिक तरुणांनी आणि काही महिलांनी सभेचा प्रसार केला.
सहकार्य
हिन्दुले बुद्रुकचे उपसरपंच श्री. दीपक मराठे, धर्मप्रेमी श्री. उमाकांत पटेल, दहिन्दुले खुर्दचे उपसरपंच श्री. राजेंद्र राजपूत, तसेच धर्मप्रेमी सर्वश्री विजय पाडवी, चंद्रकांत मिस्त्री, संदिप राजपूत, जयपाल राजपूत, नारायण राजपूत, देविसिंग राजपूत, बन्या भाऊ, मयूर चौधरी यांनी सभेला सहकार्य केले.