कुंभमेळा प्रयागराज २०१९
प्रयागराज (कुंभनगरी) : ‘सनातन संस्था समाजाला जागृत करण्याचे प्रभावी कार्य करत आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेचे ध्येय ठेवून सनातन संस्था हे कार्य करत देशाला सुधारत आहे. ‘धर्मो रक्षति रक्षित: ।’ या सिद्धांतानुसार सनातन संस्था संस्कृतीचे रक्षण करत असून संस्कृतीच्या विरोधात अपकृत्य करणार्यांचा ही संस्था विरोधही करत आहे. या संस्थेचे कार्य करणार्या सर्व साधकांचे कौतुक करतो’, असे गौरवोद्गार जम्मू-काश्मीर खालसाचे अध्यक्ष महामंडलेश्वर श्री महंत श्री रामेश्वरदास महाराज यांनी १७ जानेवारीला येथे काढले.
महामंडलेश्वर श्री रामेश्वरदास महाराज आणि त्यांच्या समवेत आलेले जम्मू येथील गोरक्षा दलाचे कार्य करणारे श्री. राजा भैय्या यांनी कुंभनगरीतील सनातनच्या राष्ट्र अन् धर्मजागृतीच्या ग्रंथप्रदर्शनास भेट दिली. त्या वेळी त्यांनी हे विचार मांडले. या वेळी सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक यांनी त्या दोघांना सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाची संपूर्ण माहिती दिली. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांच्या मंगलहस्ते महंत श्री रामेश्वरदास महाराज यांना सनातनचा हिंदी भाषेतील ‘गंगाजी की महिमा’ हा ग्रंथ भेट देण्यात आला.