Menu Close

सनातनचे ग्रंथ पाहून पुष्कळ चांगले वाटले : श्री महामंडलेश्‍वर श्री श्री १००८ महंत गोपालदास महाराज

कुंभमेळा प्रयागराज २०१९

श्री महामंडलेश्‍वर श्री श्री १००८ महंत गोपालदास महाराज (उजवीकडे) यांना ग्रंथ भेट देतांना सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

प्रयागराज (कुंभनगरी) : जम्मू-काश्मीरच्या कठुआ येथील आश्रमाचे श्री महामंडलेश्‍वर श्री श्री १००८ महंत गोपालदास महाराज यांनी १६ जानेवारीला कुंभमेळ्यातील सनातनच्या ग्रंथ आणि फ्लेक्स प्रदर्शनास भेट दिली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान राज्यांचे समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी त्यांना प्रदर्शनाची माहिती दिली. सनातनचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक यांनीही सनातनच्या कार्याविषयी त्यांना माहिती देऊन अवगत केले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी महंत गोपालदास महाराज यांना सनातनचा ‘गंगाजीका महिमा’ हा हिंदी ग्रंथ भेट दिला. या वेळी राष्ट्र आणि धर्मजागृतीविषयक ग्रंथ अन् फ्लेक्स प्रदर्शन पाहून ते म्हणाले, ‘‘मला तुमचे प्रदर्शन पाहून पुष्कळ चांगले वाटले. माझे तुम्हाला पूर्ण सहकार्य असेल. जम्मू येथे आमचे ३ आश्रम आहेत. तुम्ही आश्रमाला भेट द्यावी. तेथे तुमच्या रहाण्याची पूर्ण व्यवस्था केली जाईल.’’

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *