प्रयागराज : येथील कुंभमेळ्यातील विविध आखाड्यांतील संत-महंत यांनी केलेल्या प्रथम राजयोगी स्नानाचे थेट प्रक्षेपण भारतासह जगातील ५३ देशांतील दीड कोटी लोकांनी पाहिले. १५ जानेवारीला सकाळी ६.३० वाजता राजयोगी स्नानाचे थेट प्रक्षेपण चालू करण्यात आले होते. हे प्रक्षेपण दाखवण्यासाठी कुंभक्षेत्रात ठिकठिकाणी १६ कॅमेरे लावण्यात आले होते, तसेच कुंभमेळ्यात ठिकठिकाणी प्रोजेक्टरची सोयही करण्यात आली होती.
कुंभमेळा अधिकारी विजय किरण आनंद म्हणाले, ‘‘थेट प्रक्षेपण पहाणार्यांमध्ये भारतातील प्रामुख्याने उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, देहली, उत्तराखंड, हरियाणा, पंजाब, राजस्थान, बिहार, ओडिशा, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांतील लोकांचा समावेश होता. येथून पुढे होणार्या राजयोगी स्नानांचे थेट प्रक्षेपण भ्रमणभाषवरही लोकांना पहाता येईल. याव्यतिरिक्त गंगा नदीतील आखाड्यात चालू असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांतील संतांच्या प्रवचनांचे कार्यक्रमही थेट प्रक्षेपणाद्वारे जगात सर्वत्र दाखवण्यात येतील.’’