Menu Close

शबरीमला मंदिरात आतापर्यंत ५१ महिलांकडून अय्यप्पा स्वामींचे दर्शन : केरळ सरकारची न्यायालयात माहिती

  • सर्वच मशिदींत मुसलमान महिलांना प्रवेशबंदी असते, तर धर्मपरंपरांनुसार काही मंदिरांत हिंदु महिलांना प्रवेश वर्ज्य असतो. असे असतांनाही ‘निधर्मी’ व्यवस्थेत केवळ हिंदूंच्या धर्मपरंपरा मोडणारे निर्णय होतात, हे लक्षात घ्या ! अन्य पंथियांच्या आक्रमकतेमुळे ही तथाकथित ‘निधर्मी’ व्यवस्था त्यांच्या वाट्यालाही जात नाही, हे सत्य जाणा !
  • धर्मशिक्षण असल्यामुळे मुसलमान महिला कधीही मशिदीत जाण्याचा हट्ट धरत नाहीत. याउलट हिंदु महिला प्रवेशबंदी असलेल्या मंदिरात जाणूनबुजून घुसतात ! यावरून त्यांना धर्मशिक्षणाची किती आवश्यकता आहे, हे स्पष्ट होते !

नवी देहली : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आतापर्यंत शबरीमला मंदिरात ५१ महिलांनी प्रवेश केला आहे, अशी माहिती केरळ सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिली.

शबरीमला मंदिरात प्रवेश करणार्‍या बिंदू आणि कनकदुर्गा या ५० वर्षे वयाच्या आतील २ महिलांनी स्वतःला धमक्या येत असल्याचा दावा करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांच्या याचिकेवर सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायमूर्ती एल्.एन. राव आणि न्यायमूर्ती दिनेश महेश्‍वरी यांच्या खंडपिठासमोर नुकतीच सुनावणी झाली. या वेळी सरकारची बाजू मांडणारे अधिवक्ता विजय हंसारिया यांनी ‘शबरीमला मंदिरात ५१ महिलांनी प्रवेश केला’, अशी माहिती न्यायालयास दिली.

केरळमधील माकपच्या सरकारकडून प्रथमच ही आकडेवारी घोषित करण्यात आली. शबरीमला मंदिरात घुसलेल्या वरील २ महिलांपैकी एकीचा आधारकार्ड क्रमांक आणि दूरध्वनी क्रमांक प्रत्यक्षात एका पुरुषाचा असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे सर्व यंत्रणांची फसवणूक करून तिने शबरीमला मंदिरात प्रवेश केल्याने केरळमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *