१. ‘आरोग्य साहाय्य समिती’ची स्थापना !
‘वैद्यकीय क्षेत्रातील अपप्रवृत्तींमुळे जनतेची मोठ्या प्रमाणावर लुबाडणूक तर होत आहेच; पण नागरिकांच्या जिवाला धोकाही निर्माण झाला आहे. या अपप्रवृत्तींच्या विरोधात वैध मार्गाने लढण्यासाठी ‘आरोग्य साहाय्य समिती’ची स्थापना करण्यात आली आहे. ‘आरोग्य साहाय्य समिती’, म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातील राष्ट्रप्रेमी आणि धर्मनिष्ठ आधुनिक वैद्य (डॉक्टर), वैद्य, परिचारिका (नर्स) आदी व्यक्तींचे संघटन !
२. ‘आरोग्य साहाय्य समिती’ची उद्दिष्टे !
वैद्यकीय क्षेत्रातील अपप्रवृत्तींच्या विरोधात लढणे, इतरांनाही लढण्यासाठी कृतीप्रवण करणे, यांसह गरजू रुग्णांना, तसेच युद्ध, पूर, भूकंप इत्यादी आपत्तीतील आपद्ग्रस्तांना तत्परतेने वैद्यकीय साहाय्य करणे, ही या समितीची उद्दिष्टे आहेत.
३. ‘वैद्यकीय क्षेत्रात बोकाळलेल्या दुष्प्रवृत्ती !
बोगस डॉक्टर, रुग्णालयांत होणारा भ्रष्टाचार, अधिक पैसे कमावण्याच्या उद्देशाने रुग्णांची वारेमाप लूट करतांना त्यांना दिली जाणारी निकृष्ट प्रतीची सेवा, तसेच ‘पॅथॉलॉजी लॅब’मध्ये केल्या जाणार्या अनावश्यक महागड्या तपासण्या या सगळ्यांमुळे रुग्णांच्या जिवांशी खेळ चालला आहे. या अपप्रवृत्तींमुळे ‘सेवाभावी क्षेत्र’ अशी ख्याती असलेले वैद्यकीय क्षेत्र आता रुग्णांसाठी ‘धोकादायी क्षेत्र’ बनले आहे.
४. ‘वैद्यकीय क्षेत्रातील दुष्प्रवृत्ती रोखणे’, हे राष्ट्रकर्तव्य असल्याने ‘आरोग्य साहाय्य समिती’च्या कार्यात सहभागी व्हा !
वैद्यकीय क्षेत्रातील या दुष्प्रवृत्ती रोखणे आणि त्यांच्या विरोधात लढणे आता अनिवार्य बनले आहे. या सर्वांच्या विरोधात वैध मार्गाने लढण्यासाठी ‘आरोग्य साहाय्य समिती’च्या कार्यात सहभागी व्हा ! या कार्यासाठी राष्ट्रप्रेमी नागरिकांनी संघटित होणे आवश्यक आहे.
५. सर्व वाचक आणि हितचिंतक यांना नम्र विनंती !
‘आरोग्य साहाय्य समिती’च्या कार्यात चांगल्या डॉक्टरांचे सहकार्य अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे; म्हणूनच ‘वैद्यकीय क्षेत्रातील दुष्प्रवृत्ती रोखणे’, हे राष्ट्रकर्तव्य समजून आपल्या माहितीतील चांगल्या डॉक्टरांचे संपर्क आम्हाला कळवा. आम्ही त्यांना संपर्क करू. आपले हे अमूल्य योगदान, ही आपली साधनाच आहे !’
– डॉ. मनोज सोलंकी, संस्थापक सदस्य, आरोग्य साहाय्य समिती. (९.१.२०१९)
चांगल्या डॉक्टरांचे संपर्क कळवणे आणि मोहिमेत सहभागी होणे यांसाठी पत्ता
सौ. भाग्यश्री सावंत, आरोग्य साहाय्य समिती, ‘मधु स्मृती’, सत्यनारायण मंदिराच्या शेजारी, फोंडा, गोवा ४०३ ४०१.
संपर्क क्रमांक : ७०५८८८५६१०
इ-मेल पत्ता : [email protected]