Menu Close

गोमांस पकडून दिल्या कारणाने शिवसैनिकावर काँग्रेसच्या धर्मांध नगरसेवकाकडून आक्रमण

हिंदूंवर होणारी आक्रमणे रोखण्यासाठी हिंदु राष्ट्र अपरिहार्य !

लोकप्रतिनिधींचा भरणा असलेल्या काँग्रेस पक्षावर बंदी का आणू नये ?

fanaticsनांदेड : ११ मार्च या दिवशी पीरबुर्हाणनगर येथे गोमांस पकडल्याच्या कारणावरून गुन्हा प्रविष्ट केल्यामुळे काँग्रेसच्या एका धर्मांध नगरसेवकाने शिवसैनिकावर आक्रमण केले. त्यामध्ये शिवसैनिक सोनू बाबुराव गायकवाड हे गंभीर घायाळ झाले असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. या प्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात काँग्रेसचे नगरसेवक फारुख यांच्याविरुद्ध गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करावी, यासाठी पोलीस ठाण्यात शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

१. वसमत येथून एक धर्मांध पीरबुर्हाणनगरमध्ये रिक्शामधून गोमांस विक्री करण्यासाठी घेऊन जात असल्याची माहिती युवा सेना आणि महिला आघाडीच्या पदाधिकारी यांना मिळाली.

२. त्यानंतर शिवसैनिकांनी पीरबुर्हाणनगर येथे जाऊन त्या रिक्शाचालकाला विचारणा करण्यापूर्वीच तो तेथून पसार झाला. त्या रिक्शामध्ये ७० किलो गोमांस असल्याचे आढळून आले.

३. या कारवाईनंतरही पीरबुर्हाणनगर भागात गोमांस विक्री चालू असल्याची माहिती मिळाल्यानंतर शिवसेना महिला पदाधिकारी आणि युवा सैनिक त्या ठिकाणी पोहोचले. त्या वेळी काँग्रेसचे नगरसेवक फारूख आणि शिवसैनिक यांच्यात वाद झाला.

४. त्यानंतर फारुख यांनी युवा सैनिक सोनू बाबुराव गायकवाड याच्यावर कत्ती या शस्त्राने आक्रमण केले. (याचा अर्थ धर्मांध हे आक्रमण करण्याच्या सिद्धतेनेच येतात, असे म्हटल्यास चुकीचे होणार नाही. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *