Menu Close

धर्महानी करणार्‍या गोष्टींना विरोध करणे, ही आपली समष्टी साधना आहे : डॉ. (सौ.) ममता देसाई

डॉ. (सौ.) ममता देसाई

ऐरोली (नवी मुंबई) : सध्या पालकच दूरचित्रवाणीचे कार्यक्रम पहाण्यात मग्न असतात. प्रसारमाध्यमे चुकीचे कार्यक्रम दाखवतात. असे कार्यक्रम आपण का पहावेत ? अभिनेते आणि अभिनेत्री हे मुलांचे आदर्श बनत आहेत. त्यांचा आदर्श घेऊन हिंदु मुली कुठल्यातरी खानासमवेत पळून जातात आणि लव्ह जिहादची शिकार होतात. पालक मुलांवर धर्माचरणाचे संस्कार करत नाहीत, तसेच ते स्वतःही धर्माचरण करत नाहीत. हिंदूंना धर्मशिक्षण मिळत नसल्याने ते देवतांचे चित्र आणि चिन्ह असलेले कपडे परिधान करतात. यामुळे देवतांचा अवमान होतो. या सर्व गोष्टींना विरोध करणे, ही आपली समष्टी साधना आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या डॉ. (सौ.) ममता देसाई यांनी केले.

ऐरोली, सेक्टर १ येथील श्री विठ्ठल-रखुमाई वारकरी भजन मंडळ आणि एज्युकेशनल ट्रस्ट यांनी आयोजित केलेल्या हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने ‘मकरसंक्रांत आणि जीवनातील धर्माचरणाचे महत्त्व’ या विषयावर त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, उल्हासनगर शहरात दीड लाख हिंदूंनी धर्मांतर केले आहे, याचा आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे. आपत्ती येऊन गेल्यानंतर पोलीस आणि शासन आपल्यापर्यंत पोहोचते. संकटात आपल्याला केवळ धर्माचा म्हणजे देवाचाच आधार आहे, हे लक्षात घेऊन प्रत्येकाने साधना करणे अनिवार्य आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *