Menu Close

कुंभमेळ्यातील तिसरी गंगा म्हणजे ‘सरस्वती’ सनातनच्या ग्रंथप्रदर्शनातून वहात आहे : श्री प्रभु नारायण करपात्री

ईशान्य भारतात हिंदूंच्या धर्मांतराच्या विरोधात जनजागृतीचे कार्य करणारे काशी येथील संत श्री प्रभु नारायण करपात्री यांची सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट

प्रयागराज (कुंभनगरी) : कुंभमेळ्यात येणारे ९८ टक्के साधू हे केवळ शिबिर आणि आखाडा येथे पोट भरणे अन् स्नान करणे यांसाठी येतात. त्यांना धर्माशी काहीही देणेघेणे नाही. कुंभमेळ्यात अनेक संप्रदायांचे विविध आखाडे लागले आहेत. या आखाड्यांतील संतांनी संघटित होऊन हिंदूंचे होणारे धर्मांतर रोखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती ग्रंथ अन् फलक यांच्या प्रदर्शनाच्या माध्यमांतून धर्माचे ज्ञान देऊन अध्यात्माचा खरा प्रचार करत आहेत. सनातनचे ग्रंथप्रदर्शन म्हणजे ज्ञानाचा भांडार आहे. असे भव्य आणि ज्ञान देणारे चांगले प्रदर्शन संपूर्ण कुंभमेळ्यात नाही. कुंभमेळ्यातील तिसरी गंगा म्हणजे ‘सरस्वती’ सनातनच्या ग्रंथप्रदर्शनातून वहात आहे, असे आशीर्वचन काशी येथील संत श्री प्रभु नारायण करपात्री यांनी सनातन प्रभातच्या प्रतिनिधीशी बोलतांना दिले.

संत श्री प्रभु नारायण करपात्री म्हणाले की,

१. ईशान्य भागातील मिझोराम, मेघालय, आसाम, त्रिपुरा आणि मणिपूर येथे सहस्रो हिंदूंनी धर्मांतर करून ख्रिस्ती पंथ स्वीकारला आहे. तेथे हिंदूंना पैसे देऊन धर्मांतरित करण्यात आले आहे. मिझोराम येथील ‘मिझोफंड उग्रवादी संस्था’ बळजबरीने हिंदूंचे धर्मांतर करत आहे. तेथे ख्रिस्ती मिशनरी आणि चर्च अधिक आहेत.

२. ईशान्येतील हिंदूंची स्थिती अतिशय दयनीय आहे. तेथील हिंदु कामगारांना केवळ ५० रुपये देऊन राबवून घेतले जात आहे. दुर्गा आणि गणेशपूजन करण्यास हिंदूंना विसर पडला आहे.

३. ईशान्य भागात रा.स्व. संघ आणि विश्‍व हिंदु परिषद या संघटनांचे कार्यकर्ते आहेत; मात्र त्यांच्यावर दबाव असल्याने ते काही करू शकत नाहीत.

४. मणिपूरमध्ये ८० टक्के लोक ख्रिस्ती झाले आहेत, तर त्रिपुरातील ६० टक्के मुसलमान आहेत. रोहिंग्या मुसलमान मोठ्या प्रमाणात त्रिपुरा येथे येत आहेत.

५. मी तेथे हिंदू म्हणून कसे जगावे, पूजा कशी करावी, ख्रिस्त्यांनी पसरवलेल्या अंधश्रद्धा दूर करून तेथील लोकांना हिंदु धर्मानुसार साधना करायला शिकवतो.

६. कुंभमेळ्यात आखाड्यांनी कोट्यवधी रुपयांचा अवाढव्य खर्च करण्याऐवजी प्रत्येक आखाड्याने एक-एक गाव दत्तक घेऊन तेथील हिंदूंना धर्मशिक्षण दिले पाहिजे. हिंदूंना धर्माचे ज्ञान देऊन त्यांचे धर्मांतरापासून रक्षण केले पाहिजे.

७. राममंदिर निर्माण करण्यासाठी सर्व ठिकाणांहून पैसा गोळा करण्यात आला; मात्र राममंदिरासाठी जमा केलेला पैसा कुठे गेला ? तो पैसा उद्योगपतींना देण्यात आला आहे. राममंदिरासाठी येणारे दगड विनामूल्य मिळाले आहेत.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *