Menu Close

कोपरखैरणे (नवी मुंबई) येथे एकवक्ता सभा पार पडली

कोपरखैरणे : ‘लव्ह जिहाद’ची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत आहेत. हे षड्यंत्र रोखण्यासाठी धर्मशिक्षण आणि धर्माचरण यांची आवश्यकता आहे. उल्हासनगर, पनवेल परिसरातील हिंदूंचे ख्रिस्त्यांकडून धर्मांतर केले जात आहे. आपण रहातो, त्याठिकाणी अशा घटना घडत आहेत का ?, याकडे सतर्कतेने पहाण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. सतीश कोचरेकर यांनी केले. सेक्टर ४ मधील श्री वरद विनायक मंदिर येथे समितीच्या वतीने एकवक्ता सभा घेण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते. या सभेला ६० जण उपस्थित होते.

या वेळी श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे श्री. अजय बर्गे, श्री. भरत माळी, श्री योग वेदांत समितीचे श्री. प्रकाश लोरे आणि श्री. संजय भिलारे तसेच श्री विघ्नहर्ता युवा प्रतिष्ठानकडून श्री. दिनेश वाशिवले उपस्थित होते.

क्षणचित्र : सभा संपल्यानंतर महिलांनी नियमित धर्मशिक्षणवर्ग घेण्याची मागणी केली.

विशेष सहकार्य

श्री विघ्नहर्ता युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. दिनेश वाशिवले यांनी मंदिरासमोरील जागा तसेच सभेसाठीचे साहित्य विनामूल्य उपलब्ध करून दिले.

अभिप्राय

१. श्री. अजय बर्गे, श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान – ‘लव्ह जिहाद’ची माहिती घराघरात पोहोचवायला हवी. प्रत्येकाने वैयक्तिक स्तरावर धर्माचरणाला आरंभ करायला हवा.

२. श्री. भरत माळी, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान – या दैवी कार्यात प्रत्येकाने सहभागी व्हायला हवे.

३. श्री. संजय भिलारे, योग वेदांत समिती – हिंदु धर्म रक्षणासाठी उत्कृष्ट माहिती मिळाली. समितीचे हिंदूसंघटनाचे कार्य सध्याच्या काळाची आवश्यकता आहे .

४. श्री. दिनेश वाशिवले, अध्यक्ष श्री विघ्नहर्ता युवा प्रतिष्ठान, कोपरखैरणे – हिंदूंमध्ये ‘लव्ह जिहाद’ विषयीची जागृती प्रत्येक सणाच्या वेळी करायला हवी. यापुढे आमची संघटना प्रत्येक कार्यक्रमात हिंदूसंघटनासाठी प्रयत्न करेल.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *