पाकव्याप्त काश्मीरचे नेते शौकत अली यांच्याकडून पाकचा चेहरा उघड !
संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयाबाहेर पाकच्या विरोधात धरणे आंदोलन
जिनेव्हा (स्वित्झर्लंड) : पाकिस्तान त्याच्या कह्यात असलेल्या काश्मीरचा वापर जिहादी आतंकवादी कारवायांना प्रारंभ करण्यासाठी करत आहे, असा दावा पाकव्याप्त काश्मीरमधून काढून टाकण्यात आलेले नेते शौकत अली काश्मिरी यांनी केला आहे. ते येथे एका कार्यक्रमात बोलत होते.
शौकत अली म्हणाले की, पाकिस्तान एकीकडे आतंकवादाच्या विरोधात आपली लढाई असल्याचे सांगतो, तर दुसरीकडे काश्मीरमध्ये लष्कर-ए-तोयबाचे आतंकवादी उघडपणे फिरतात. पाकव्याप्त काश्मीरमध्ये आतंकवाद्यांचा वाढता वावर असल्याने येथे विविध प्रश्न निर्माण झाले आहेत. प्रशासनाचे याकडे लक्ष नाही.
संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयाबाहेर पाकव्याप्त काश्मीरच्या नेत्यांचे पाकिस्तानच्या विरोधात धरणे
संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयाबाहेर पाकव्याप्त काश्मीरच्या नेत्यांकडून पाकविरोधात ११ मार्चला धरणे आंदोलन करण्यात आले. या नेत्यांनी येथील अत्याचार थांबवावे, या मागणीचे निवेदन संयुक्त राष्ट्राला दिले. या वेळी वर्ल्ड सिंधी काँग्रेसचे अध्यक्ष लखू लुहाना म्हणाले की, सिंध, बलुचिस्तान, पाकव्याप्त काश्मीर आणि गिलगीट-बाल्टिस्तान या भागांत मानवी अधिकारांची स्थिती वाईट आहे. आम्ही या आंदोलनाद्वारे जगाचे लक्ष याकडे वेधू इच्छितो.
पाकव्याप्त काश्मीरमधील आतंकवाद
१. पाक आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये आतंकवाद्यांची १६० प्रशिक्षण केंद्रे आहेत.
२. भारतविरोधी कारवायांमध्ये ही केंद्रे सहभागी असतात.
३. वर्ष २०१० मध्ये तत्कालीन सैन्यदल प्रमुख यांनी मान्य केले होते की, पाकव्याप्त काश्मीरमध्ये ४२ हून अधिक आतंकवादी केंद्र चालवली जातात.
४. ही सर्व केंद्रे मुझफ्फराबाद आणि लाहोर दरम्यान आहेत. येथे इतर आतंकवादी संघटनांचीही केंद्रे आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात