Menu Close

‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ : महाराष्ट्रात ठिकठिकाणी दिलेल्या निवेदनांनंतर सर्वांचाच सकारात्मक प्रतिसाद !

मुंबई : राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महाराष्ट्रात ठिकठिकाणी विविध प्रशासकीय कार्यालय, पोलीस ठाणे, शिक्षण विभाग यांना निवेदने सादर करण्यात आले. समितीच्या या मोहिमेचे अनेकांनी कौतुक केले, तर पुष्कळ जणांचा या मोहिमेला सकारात्मक प्रतिसादही लाभला. याविषयीचा वृत्तांत येथे देत आहोत.

कोल्हापूर

१. आजरा येथे पोलीस ठाणे, तहसीलदार, गटशिक्षण अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. तहसीलदार भूतल देशमुख यांनी त्यांची बैठक चालू असतांना समितीच्या कार्यकर्त्यांना आत बोलावून ‘समितीचे कार्य चांगले आहे’, असे सांगून कौतुक केले.

२. शाहूवाडी येथे नायब तहसीलदार श्री. विजय जमादार यांना, तसेच पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. या वेळी श्री. चारुदत्त पोतदार, श्री. रमेश पडवळ, डॉ. संजय जाधव, डॉ. संजय गांधी, श्री. आनंद पाटील यांसह अन्य उपस्थित होते.

३. राजारामपुरी येथील सात शाळांमध्ये निवेदने देण्यात आली. शाळांमधून १ सहस्र २३० विद्यार्थ्यांपर्यंत विषय पोहोचवता आला. शाळांमधील मुख्याध्यापकांनी हिंदु जनजागृती समितीचे आभार मानले आणि असे उपक्रम घेण्यासाठी पुन्हा बोलावले.

पुणे

भोर येथील निवासी नायब तहसीलदार श्री. बाळासाहेब शिरसाट आणि भोर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार श्री. सुनील पवार यांना निवेदन देण्यात आले. या वेळी दैनिक सनातन प्रभातचे वाचकही यात सहभागी झाले होते. आकुर्डी येथील ६ शाळांमध्ये निवेदन देण्यात आले. आळंदी येथील २ शाळांमध्ये घेतलेल्या प्रबोधनपर व्याख्यानाचा लाभ १ सहस्र ३५० हून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला.

पिंपरी-चिंचवड पोलीस उपायुक्तांना निवेदन देण्यात आले. महापौर श्री. राहुल जाधव यांना निवेदन दिल्यावर त्यांनी ‘हे निवेदन आम्ही  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये पाठवून राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासंबंधी सर्व ती काळजी घेऊ’, असे आश्‍वासन दिले.

नगर

नगर येथे उपचिटणीस तथा नायब तहसीलदार श्रीमती एम्.एस्. आंधळे यांना निवेदन देण्यात आले. त्या म्हणाल्या, ‘‘समितीचा हा उपक्रम चांगला असून यामुळे समाजात जागृती निर्माण होते. आम्हीही आमच्याकडून पूर्ण प्रयत्न करू. आम्ही पोलीस प्रशासनाच्या मार्फतही एक परिपत्रक प्रसिद्धीस दिले आहे.’’ या वेळी अन्य धर्मप्रेमी उपस्थित होते.

अंबाजोगाई (जिल्हा बीड)

अंबाजोगाई येथे उपजिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, गटशिक्षणाधिकारी कार्यालय, शहर पोलीस ठाणे, तसेच वेणुताई कन्या विद्यालय, श्री खोलेश्‍वर विद्यालय प्राथमिक विभाग २ आणि माध्यमिक विभाग या ठिकाणी निवेदन देण्यात आले. या वेळी राष्ट्रप्रेमी सर्वश्री बालाजी भारजकर, ओम काळे, संदेश काळे, सुभाष महिंद्रकर, अशोक मुंडे आदी उपस्थित होते. या वेळी शिक्षिकांनी ७०० विद्यार्थिनींना एकत्र करून समितीच्या वतीने महिला कार्यकर्त्यांना विषय मांडण्यास सांगितले आणि समितीच्या कार्याचे कौतुक केले.

सातारा

सातारा तालुक्यासह वडूज आणि वाई येथेही निवेदने देण्यात आली. वडूज (सातारा) छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य अर्जुन खरात यांनाही निवेदन देण्यात आले.

रायगड

रायगड जिल्ह्यात पोलीस, प्रशासन आणि महाविद्यालये येथे निवेदन देण्यात आले. या वेळी राष्ट्राभिमानी श्री. विलास पुंडले, श्री. रोहिदास शेडगे, श्री. प्रभाकर विठ्ठल पंडित आणि सौ. प्रतिभा चौहान उपस्थित होत्या.

मुंबई

मुंबई येथे २६ जानेवारीला राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखावा, ‘व्हॅलेंटाईन डे’ सारख्या पाश्‍चात्त्य संस्कृतीचे उदात्तीकरण रोखावे, तसेच कोट्यवधी हिंदूंंच्या भावना लक्षात घेऊन अयोध्येत श्रीरामाचे भव्य मंदिर उभारावे, या मागण्यांचे समितीचे कार्यकर्ते आणि राष्ट्रप्रेमी यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस ठाणे आणि महाविद्यालय येथे निवेदन दिले.

आतापर्यंत वांद्रे येथील जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, मुलुंड येथील तहसीलदार डॉ. संदीप थोरात, वांद्रे येथील पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक पी. एस्. काकडे, तसेच वांद्रे येथील चेतना महाविद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. एम्.पी. जोशी यांना निवेदन देण्यात आले.

निवेदन देतांना धर्मप्रेमी सौ. मथुरा दवडे, श्री. विनोद शिंदे, श्री. अशोक घाडगे, श्री. केशव गोताड, सनातन प्रभातचे वाचक श्री. चंद्रकांत वैती, तसेच समितीच्या सौ. नीता चव्हाण आणि श्री. रमेश घाटकर उपस्थित होते.

या वेळी ‘राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी आम्ही योग्य ती कृती आरंभ केली आहे’, असे जिल्हाधिकारी श्री. सचिन कुर्वे यांनी सांगितले, तर ‘तुमचे कार्य अतिशय चांगले आहे. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्राभिमान जागृत करणारे क्रांतीकारकांचे चित्र (फ्लेक्स) प्रदर्शन लावण्यासाठी आम्ही प्रयत्न करू’, असे चेतना महाविद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. एम्. पी. जोशी यांनी सांगितले.

ऐरोली (नवी मुंबई)

ऐरोली (नवी मुंबई) येथील ४ विद्यालयांतील मुख्याध्यापकांना निवेदन देण्यात आले. या वेळी शाळेच्या मुख्याध्यापकांनी समितीच्या उपक्रमाचे कौतुक करून ‘शाळेतील विद्यार्थ्यांचे यासंदर्भात प्रबोधन करू’, असे सांगितले, तसेच सरस्वती विद्यालयाकडून ‘भविष्यात यासंदर्भात शाळेत उपक्रम राबवल्यास तुम्हाला निमंत्रित करू’, असेही सांगण्यात आले.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *