सांगवी (पुणे) : मातृत्व हे स्त्रीला मिळालेले वरदान आहे. असे असतांना स्त्री ही चूल आणि मूल यांमध्ये अडकली आहे, असा विचार स्त्रीमुक्तीवाले करतात. राजमाता जिजाऊंनी असाच विचार केला असता, तर छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आपल्याला लाभले असते का ?
पालकांनी मुलींना अभियंता, आधुनिक वैद्य केले; पण ते तिच्यात आई निर्माण करू शकले नाहीत. त्यामुळे तिच्यामध्ये आई निर्माण करा, असे प्रतिपादन अधिवक्त्या श्रीमती अपर्णा रामतीर्थकर यांनी केले. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सांगवी विकास मंच यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमांत ‘आई तू जिजाऊ हो’ या विषयावर त्या बोलत होत्या.
मार्गदर्शनानंतर अनेक पालकांनी अधिवक्त्या रामतीर्थकर यांनी आमच्या पाल्यांना समुपदेशन करावे, अशी विनंती केली.
त्या पुढे म्हणाल्या…
१. मुलींना धर्मशिक्षण नसल्यामुळे आज मुली धर्मांतर करून लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकत आहेत. मुसलमान स्त्रियांप्रमाणे हिंदु स्त्रियांनीही धर्माभिमान बाळगायला हवा.
२. मुलांना इंग्रजी शिकवा; पण त्यांना इंग्रज करू नका.
क्षणचित्र : अधिवक्त्या रामतीर्थकर मागील सप्ताहात अतीदक्षता विभागात भरती होत्या. प्रकृती अस्वास्थ्य असूनही त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात