Menu Close

कर्नाटक : हिंदु राष्ट्र-जागृती सभांना काँग्रेस, धर्मांध संघटना आणि पुरो(अधो)गामी यांचा तीव्र विरोध

मंगळूरू आणि शिवमोग्गा येथील सभा मैदानात घेण्यास पोलिसांनी अनुमती नाकारली !

  • पोलीस आणि प्रशासन यांचा हिंदुद्वेष ! राष्ट्रप्रेम आणि धर्मप्रेम जागृत करणार्‍या हिंदु राष्ट्र-जागृती सभांना विरोध करणारे पोलीस अन् प्रशासन भारताचे कि पाकचे ?
  • कर्नाटकातील जनता दल (धर्मनिरपेक्ष) आणि काँग्रेस यांच्या सरकारला हिंदूंच्या हत्या करून इस्लामी राजवट आणणारा क्रूरकर्मा टिपू सुलतान प्रिय आहे; मात्र लोककल्याणकारी हिंदु राष्ट्राचा उद्घोष करणारी सभा नकोशी वाटते, हे लक्षात घ्या !

मंगळूरू : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मंगळूरू आणि शिवमोग्गा येथे २७ जानेवारी या दिवशी हिंदु राष्ट्र-जागृती सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. या सभांच्या प्रसारासाठी लावण्यात आलेल्या भित्तीपत्रकांवरील ‘हिंदु राष्ट्र’ या शब्दावर आक्षेप घेत हिंदुद्वेष्ट्यांनी सभांना मोठ्या प्रमाणात विरोध केला. ‘हिंदु राष्ट्राची मागणी घटनाविरोधी असल्यामुळे या सभेचे आयोजन करणार्‍यांच्या विरोधात देशद्रोहाचा खटला प्रविष्ट करा’, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. (राष्ट्रघातकी निर्णय घेऊन आणि भ्रष्टाचार करून काँग्रेसने देशाला विनाशाच्या खाईत लोटले. त्यामुळे प्रथम काँग्रेसवरच देशद्रोहाचा गुन्हा प्रविष्ट करून तिच्यावर बंदी आणायला हवी. हिंदूंच्या हिताच्या प्रत्येक गोष्टीला काँग्रेस विरोध करते, हे जाणा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) तसेच धर्मांधांच्या संघटना, तसेच काँग्रेस आणि पुरो(अधो)गामी यांच्याकडून मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला. या सभा होऊ नयेत, यासाठी समितीवर दबाव आणण्यासाठी हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्य समन्वयक श्री. गुरुप्रसाद गौडा आणि दक्षिण कन्नड जिल्हा समन्वयक श्री. चंद्र मोगेर यांना विदेशातून ‘इंटरनेट कॉल’ येत आहेत. श्री. चंद्र मोगेर यांना २२ जानेवारीपासून एकूण १५ ‘इंटरनेट कॉल’ आले आहेत, तर श्री. गुरुप्रसाद गौडा यांनाही अशाच प्रकारचे १४ कॉल आले आहेत. श्री. गौडा यांना आलेले ‘कॉल’ हे इस्लामी राष्ट्रांतून आले आहेत. (हिंदूंना आणि पर्यायाने भारताला विरोध करण्यासाठी इस्लामी राष्ट्रे कशा प्रकारे कार्यरत आहेत, हे यातून दिसून येते. ‘भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना झाल्यावर धर्मांधांना हिंदुविरोधी कारवाया करता येणार नाहीत’, हे त्यांनी जाणल्यामुळे हा विरोध होत आहे ! भारतातील धर्मांधांना इस्लामी राष्ट्रांतून साहाय्य मिळते; मात्र भारतातील धर्माभिमानी हिंदूंना स्वकियांकडून साहाय्य मिळणे तर सोडाच, त्यांना विरोध होतो, हे संतापजनक ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) सामाजिक संकेतस्थळांवरही या सभांना पुरोगामी आणि हिंदुद्वेष्टे यांच्याकडून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे.

शिवमोग्गा येथे मैदानात सभा घेण्यासाठी पोलिसांनी अनुमती नाकारली आणि सभागृहात सभा घेण्यास समितीच्या कार्यकर्त्यांना सांगितले. ही सभा कोणत्या सभागृहात घ्यायची, हेही त्यांनी सांगितले; मात्र सभेच्या बाहेर कोणत्याही प्रकारचे प्रदर्शन लावता येणार नाही, अशी सूचना दिली. (हिंदूंनो, तुम्ही संघटित झाला नाहीत, तर ‘तुम्ही देवळात जायचे कि नाही ?’, ‘तुम्ही कोणत्या देवळात जायचे ?’, ‘कोणत्या देवाचा उपवास करायचा ?’, हे पोलीसच तुम्हाला ठरवून देतील, हे लक्षात घ्या आणि परिणामकारक संघटन उभारण्यासाठी सिद्ध व्हा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) ‘या सभेचे चित्रीकरण करणार’, असेही त्यांनी सांगितले. (धर्मांधांच्या कार्यक्रमांत जाऊन अशा प्रकारे चित्रीकरण करण्याचे धारिष्ट्य पोलिसांनी दाखवले असते का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) मंगळूरू येथील सभाही सभागृहात घेण्यात येणार आहे.

हिंदु राष्ट्र-जागृती सभांच्या आयोजनाचे वृत्त समजताच हिंदुद्वेष्ट्यांनी खालील प्रतिक्रिया व्यक्त केल्या…

(म्हणे) ‘धर्माच्या नावाने राष्ट्र निर्माण होण्यासाठी सभा घेणे देशाच्या विरोधात !’ – प.वी. मोहन, प्रदेशाध्यक्ष, कर्नाटक काँग्रेस

जेएन्यू विद्यापिठामध्ये ‘भारत तेरे टुकडे होंगे’, अशा घोषणा काँग्रेसला चालतात; मात्र वैध मार्गाने केलेली हिंदु राष्ट्राची मागणी चालत नाही, हे लक्षात घ्या !

भारत हा एक धर्मनिरपेक्ष देश असल्याचे घटनेनेच स्पष्ट केले आहे. (घटनेत ‘धर्मनिरपेक्ष’ हा शब्द नव्हता. तो काँग्रेसने घुसडला ! सध्या ‘धर्मनिरपेक्ष’ म्हणजे हिंदूंना कायदा आणि मुसलमानांना फायदा असेच आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) येथे हिंदु धर्माच्या नावाने राष्ट्र निर्माण व्हावे, यासाठी सभा घेणे हे घटना आणि देश यांच्याविरुद्ध आहे. असे करणे हे देशद्रोहाच्या कृतीच्या अंतर्गत समाविष्ट होते. या कार्यक्रमाचे (सभेचे) नियोजन करणारे आणि त्यासाठी जागा उपलब्ध करून देणारे यांच्या विरोधात देशद्रोहाची तक्रार दाखल करायला हवी.’’ (हिंदूंच्या सभेला विरोध करणारी काँग्रेस भविष्यात हिंदूंच्या प्रत्येक न्यायहक्कांवर गदा आणेल, हे लक्षात घेऊन येणार्‍या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मतपेटीद्वारे तिची जागा दाखवून द्या ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

(म्हणे) ‘अशा धोकादायक सभांना अनुमती देऊ नये ! – मुनीर काटिपळ्ळ, प्रदेशाध्यक्ष, डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया

धर्मांध हेच भारतासाठी धोकादायक असतांना त्यांनी हिंदूंच्या सभांना ‘धोकादायक’ संबोधणे संतापजनक !

हिंदु राष्ट्र-जागृती सभा ही धोकादायक आणि घटनेच्या विरोधात असल्याने तिला अनुमती देऊ नये. अशा प्रकारचा सभेच्या प्रचारासाठी फलक लावणे निषेधार्ह आहे. सभेचे आयोजक, स्थळ उपलब्ध करून देणारे आणि प्रसारसाहित्य लावणारे यांच्यावर देशद्रोहाची तक्रार प्रविष्ट करायला हवी. (एम्आयएम्चे अकबरुद्दीन ओवैसी ‘१० मिनिटांत हिंदूंना संपवू’, अशी घोषणा देत असतांना हे धर्मांध कुठल्या बिळात लपले होते ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) पोलीस आणि महानगरपालिका यांनी त्यांच्यावर त्वरित कारवाई करायला हवी.

वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांकडून हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ !

राष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्यरत असलेल्या धर्माभिमान्यांचा छळ करणारे पोलीस धर्मांधांसमोर नांगी टाकतात !

हिंदु राष्ट्र-जागृती सभेला अनुमती मिळावी, यासाठी समितीचे श्री. चंद्र मोगरे आणि श्री. प्रभाकर नायक यांनी मंगळूरूच्या वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांची भेट घेतली. त्या वेळी पोलीस अधिकार्‍यांनी समितीच्या कार्यकर्त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. (कर्नाटकमध्ये अबिद पाशा आणि त्याच्या टोळीने हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या केल्या. त्याचे अन्वेषण न करणारे पोलीस हिंदुत्वनिष्ठांवर मर्दुमकी गाजवतात, हे लक्षात घ्या ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) श्री. नायक हे वयस्कर असतांनाही पोलीस अधिकार्‍यांनी त्यांचा एकेरी उल्लेख करून त्यांच्याशी बोलतांना हीन भाषेचा वापर केला. कार्यकर्त्यांशी ते मोठ्या आवाजात, ‘हिंदु राष्ट्राची मागणी करणे, ही घटनाबाह्य कृती आहे. उद्या मुसलमानही ‘हे राष्ट्र इस्लामी राष्ट्र करणार’, असे सांगू शकतात. तुम्ही सर्वांना फोडण्याचे काम करत आहात. मी तुम्हाला कायद्याचा सल्ला देत आहे. तुम्हाला बुद्धी नाही. मागच्या वेळी १ घंटा समजावले होते; मात्र तुम्ही तुमचे सूत्र सोडत नाही. तुम्ही दिसायला साधे दिसता; मात्र तुमचे खरे स्वरूप आता उघड होत आहे.’’ हे सांगतांना ते मोठ्या आवाजात बोलत होते. या वेळी त्यांनी श्री. प्रभाकर नायक यांची माहिती विचारून घेतली. त्या वेळी श्री. मोगेर यांनी या माहितीची आवश्यकता नसल्याचे सांगितल्यावर ‘मला सर्व आधिकार आहेत’, असे उद्दामपणे सांगितले. (असे उद्दाम पोलीस अधिकारी जनतेशी कसे वागत असतील, याचा विचारही न केलेला बरा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) श्री. चंद्र मोगेर यांचाही पत्ता विचारल्यावर ‘मी दौर्‍यावर असल्यामुळे फिरत असतो’, असे सांगितल्यावर ‘आज रात्री कुठे रहाणार आहात, ते सांगा’, असा उद्दामपणे प्रश्‍न विचारला. ‘तुम्ही पत्ता दिला नाही, तर तुमच्यावर कायदेशीर कार्यवाही करू. हा गुन्हा आहे. २४ घंट्यांत तुम्हाला अटक करू’, असे सांगितले. (धर्मांधांशी अशा प्रकारे उद्धटपणे बोलण्याचे धारिष्ट्य पोलिसांनी केले असते का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

हिंदूंची नावे धारण करून धर्मांधांकडून दूरभाष !

अशा कावेबाज धर्मांधांकडून हिंदूंनी सावध रहावे !

अशोक नामक एका व्यक्तीने श्री. चंद्र मोगेर यांना दूरभाष करून ‘मी उच्चपदापर्यंत पोहोचण्यास मुसलमान कारणीभूत आहेत. मुसलमान चांगले आहेत. भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. तुम्ही खोटे सांगता’, असे सांगितले. त्यावर श्री. चंद्र मोगेर यांनी काश्मीरमध्येे हिंदूंवर होत असलेल्या अन्यायाविषयी सांगितल्यावर ‘हे सर्व खोटे आहे. तुम्ही सर्व चड्डीवाले (संघाचे) आहात. तुमचे सर्व ठाऊक आहे’, असे सांगितले. ‘तुम्ही भारतात हिंदु राष्ट्र कसे आणणार ?’, ‘आम्ही भारताचे इस्लामी राष्ट्र करू’, असे शक्य आहे का ?’, असा प्रश्‍न उपस्थित केला. या व्यक्तीने जरी स्वतःचे नाव हिंदु सांगितले असले, तरी बोलतांना ती व्यक्ती मुसलमान असल्याचे लक्षात येत होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *