कोल्हापूर : ‘व्हॅलेंटाईन डे’च्या पार्श्वभूमीवर प्रेमाचे बीभत्स सादरीकरण करण्याच्या नावाखाली हल्ली एकतर्फी प्रेमातून मुलींची छेडछाड आणि हिंसक कृत्ये घडत आहेत. तसेच या दिवशी होणार्या मेजवान्यांमधून युवक-युवती यांच्यात मद्यपान करणे, धूम्रपान करणे, अमली पदार्थांचे सेवन आदी अपप्रकारांत प्रचंड वाढ झाली आहे. तरी ‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी १४ फेब्रुवारी हा दिवस शाळा-महाविद्यालयांत ‘मातृ-पितृ दिवस’ म्हणून साजरा करण्यास प्रोत्साहन द्यावे, अशा मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नागाव येथील उपसरपंच सौ. सुनीता पोवार यांना देण्यात आले.
गडहिंग्लज येथील गिजवणे येथील विठ्ठल मंदिरात आयोजित हळदी-कुंकू कार्यक्रमात सौ. रंजना पाटील यांनी ‘व्हॅलेंटाईन डे’च्या विषयाच्या संदर्भात प्रबोधन केले. याचा लाभ ३० महिलांनी घेतला.