चंद्रपूर : प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने होणारा राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यात यावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ ही मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेच्या अंतर्गत शाळा-महाविद्यालये यांमध्ये ३१ ठिकाणी निवेदन देण्यात आले, तसेच ११ शाळांमध्ये राष्ट्रध्वजाचा मान कसा राखायचा ?, राष्ट्रध्वजाची विटंबना होऊ नये, यासाठी काय प्रयत्न करायचे ? याविषयी प्रबोधन करण्यात आले. २ सहस्रांहून अधिक विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला. समितीच्या वतीने लावण्यात आलेल्या क्रांतीकारकांच्या फ्लेक्स प्रदर्शनाचा १ सहस्र विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.
वर्धा जिल्ह्याचे उपविभागीय जिल्हाधिकारी उत्तम दिघे आणि पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, सिंदी (वर्धा) येथे पोलीस अधीक्षक रामकृष्ण भाकडे, हिंगणघाट येथील तहसीलदार सचिन यादव, चंद्रपूर येथील अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलांत्रे, राजुरा येथील तहसीलदार डॉ. रवींद्र होळी यांना निवेदन देण्यात आले .
२६ जानेवारीला आर्वी नाका, वर्धा येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रबोधन कक्ष उभारण्यात आला होता. या प्रबोधन कक्षावर ध्वनीक्षेपकाच्या माध्यमातून नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले.
अभिप्राय
स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार्या क्रांतीकारकांचे प्रदर्शन लावल्याने मुलांमध्ये त्यांच्याविषयी नक्कीच आदर निर्माण होईल. तुमचा उपक्रम अतिशय उत्तम आहे.
– श्री. नितीन मडावी, ‘स्व. सौ. आत्राम उच्च प्राथमिक विद्यालय, चंद्रपूर’ येथील शिक्षक
क्षणचित्रे
१. प्रबोधन कक्षावर येऊन नागरिक स्वतःहून माहिती विचारत होते.
२. प्रबोधन केल्यानंतर बर्याच जणांनी राष्ट्रध्वज विकत घेण्याचे टाळले.
0 Comments