Menu Close

१ सहस्र ८०० गायींचा सांभाळ करणार्‍या जर्मन महिलेला ‘पद्मश्री’

  • एका जर्मन महिलेला गायींचे महत्त्व लक्षात येते, ते गोरक्षकांना ‘समाजकंटक’ म्हणवणार्‍यांना कधी लक्षात येणार ?
  • गोहत्यांचे समर्थन करणारे तथाकथित बुद्धीवादी, निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी एका जर्मन महिलेकडून काही शिकतील का ?

नवी देहली : मथुरा येथे १ सहस्र ८०० बेवारस गायींची देखभाल करणार्‍या जर्मनीतील ६१ वर्षीय महिला फ्रेडरिक एरिना ब्रूनिंग यांना या वर्षी ‘पद्मश्री’ पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली आहे. ‘भारत सरकारने माझ्या कार्याची नोंद घेतल्याचा मला आनंद आहे’, अशी प्रतिक्रिया पुरस्कार घोषित झाल्यानंतर फ्रेडरिक यांनी व्यक्त केली आहे. ‘या पुरस्कारामुळे इतर लोकही प्रेरणा घेतील, अशी मला अपेक्षा आहे. लोकांनी प्राणीमात्रांवर दया करावी, हाच संदेश मी सर्वांना देईन’, असेही त्या म्हणाल्या.

१. २५ वर्षांपूर्वी ३६ वर्षीय फ्रेडरिक बर्लिनमधून भारतामध्ये पर्यटनासाठी आल्या होत्या. मथुरेमध्ये भटकंती करत असतांना तेथे रस्त्यावरील अनेक गायी त्यांना दिसल्या. त्यांनी मथुरेतच राहून या गायींसाठी काहीतरी करण्याचा निर्णय घेतला. जर्मनीमधील वडिलांची काही संपत्ती विकून त्यांनी या गोशाळेची स्थापना केली.

२. मथुरेतील स्थानिक लोक आता त्यांना ‘गोमाता की आश्रयदाता’ म्हणून ओळखतात, तर ‘सुदेवी माताजी’ या नावाने त्यांना हाक मारतात. ‘गायी या माझ्या मुलांप्रमाणे आहेत. मी त्यांच्याविना राहू शकत नाही’, असे त्या म्हणतात.

३. गायी सांभाळण्यासाठी फ्रेडरिक यांना प्रतिमास ३५ लाख रुपये इतका खर्च येतो.

४. प्रतिवर्षी मला व्हिसाचे नूतनीकरण करावे लागते. त्यामुळे भारत सरकारने आता मला दीर्घ कालावधीचा व्हिसा किंवा भारतीय नागरिकत्व द्यावे’, अशी मागणी फ्रेडरिक यांनी केली आहे. (अशी मागणी का करावी लागते ? अदनान सामी यांच्यासारख्या पाकच्या कलाकारांना भारताचे नागरिकत्व मिळते; मात्र गोपालन करणार्‍या एका विदेशी महिलेला त्यासाठी मागणी करावी लागते, हे भाजप सरकारसाठी लज्जास्पद ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *