Menu Close

कुंभनगरी येथील हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘फॅक्ट’ प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद !

देश-विदेशातून आतापर्यंत ६ सहस्र भाविकांनी प्रदर्शनाला भेट दिली असून अनेकांनी समितीच्या कार्यात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली !

प्रदर्शन पहातांना साधू-संत आणि धर्मप्रेमी हिंदू

प्रयागराज (कुंभनगरी) : कुंभमेळ्याच्या निमित्ताने हिंदु जनजागृती सतिमीच्या वतीने काश्मीर आणि बांगलादेेश येथील हिंदूंवर झालेल्या अत्याचारांचे भीषण वास्तव कथन करणारे ‘फॅक्ट’ प्रदर्शन लावण्यात आले आहे.  येथील भूमा निकेतन पिठाधीश्‍वर मंडपात १५ जानेवारीपासून हे प्रदर्शन चालू आहे. गेल्या १५ दिवसांत ६ सहस्र भाविकांनी हे प्रदर्शन पाहून समितीच्या कार्यात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अनेकजण हे प्रदर्शन पाहिल्यावर ‘आपल्याच देशात आपल्याच बांधवांना परागंदा व्हावे लागल्या’ने सरकारविषयी आपला रोष प्रकट करत आहेत.

हे प्रदर्शन पहातांना अनेकांना याचे गांभीर्य समजल्याने त्यांनी त्यांच्यासमवेत कुंभमेळ्यात आलेल्या इतरांनाही भ्रमणभाष करून लागलीच प्रदर्शन पहाण्यास बोलावून घेतले. काही भाविक प्रदर्शन पाहून गेल्यावर उत्स्फूर्तपणे इतर सहकार्‍यांनाही हे प्रदर्शन पहाण्यासाठी घेऊन येत आहेत. ‘आपल्याच देशात आपल्या हिंदु बांधवांची ही रक्तरंजित स्थिती झाल्याचे आम्हाला माहितीच नव्हते. समितीने हे प्रदर्शन भरवून समस्त हिंदूंना जागृत करण्याचे चांगले कार्य केले आहे’, अशा प्रतिक्रिया काही भाविक व्यक्त करत आहेत. प्रदर्शन पहातांना काही जणांना अक्षरश: रडू येते, तर काही जण नि:शब्द होतात.

प्रदर्शन पहातांना शिवसेनेचे प्रयागराज शहरातील पदाधिकारी

प्रदर्शन पाहिल्यावर हे प्रदर्शन आपल्या भागात लावण्याची अनेकांनी विनंती केली. यासाठी आवश्यक असणारे सहकार्य करण्याची सिद्धताही दर्शवली. यामध्ये विशेषत: मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तरप्रदेशातील मथुरा, तसेच अन्य जिल्हे येथील भाविकांची मागणी अधिक असल्याचे आढळून आले.

अयोध्या येथील भुलामोरचे बजरंग दलाचे अध्यक्ष डॉ. विजय शंकर दुबे म्हणाले की, आम्हीही धर्मजागृतीचे कार्य करत आहोत; मात्र तुमच्याकडील माहिती अधिक उपयुक्त आहे. असे सांगून त्यांनी अनेक फलकांची छायाचित्रे काढून घेतली; तसेच आपणही अशाप्रकारे आमच्या विभागात प्रदर्शन भरवू, असे आश्‍वासन दिले. हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनीही हे प्रदर्शन आमच्या विभागात आयोजित केल्यास आजूबाजूच्या गावांमध्ये मी स्वत: पुढाकार घेऊन याचा प्रचार करीन, असे ते म्हणाले. कुंभमेळा पहाण्यासाठी फ्रांसहून आलेल्या जॉन यांंनी प्रदर्शन पाहून काश्मीरची समस्या आवर्जून समजून घेतली. त्यांनी ‘एस्.एस्.आर्.एफ्.’चे संकेतस्थळ पाहून कार्यात सहभागी होण्याचे मत व्यक्त केले. गेल्या काही वर्षांपासून ते भारतात साधना करायला आले आहेत. एक रिक्शाचालक प्रदर्शनस्थळाजवळून प्रवाशांची वाहतूक करत होता. त्याने प्रदर्शनासंदर्भात उद्घोषणा ऐकून २ घंटे प्रदर्शन पाहिले.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *