- देशात ख्रिस्ती मिशनरींकडून, तसेच चर्चमधून असे प्रकार घडत आहेत का ?, याची भाजप सरकारने चौकशी केली पाहिजे !
- ख्रिस्त्यांच्या चर्चमधील पाद्य्रांकडून करण्यात आलेल्या लैंगिक शोषणाची वृत्ते भारतीय प्रसारमाध्यमे जाणीवपूर्वक दडपतात आणि हिंदूंच्या संतांवरील खोट्या आरोपांना वारेमाप प्रसिद्धी देतात अन् चर्चासत्रे आयोजित करतात, हे लक्षात घ्या !
- अमेरिकेतीलच नव्हे, तर युरोप आणि अन्य ख्रिस्ती देशांत अशीच स्थिती आहे. पोप यांना अनेकदा यासाठी क्षमा मागावी लागली आहे, हे भारतातील पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी यांना दिसत नाही का ?
टेक्सास (अमेरिका) : गेल्या काही दशकांमध्ये अमेरिकेच्या पेन्सिलव्हेनिया राज्यातील चर्चमध्ये पाद्य्रांकडून लहान मुलांवर झालेल्या लैंगिक अत्याचारांची माहिती समोर आल्यानंतर आता अमेरिकेतीलच टेक्सासमध्येही अशा प्रकारचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी ३०० पाद्य्रांची नावे समोर आली आहेत. टेक्सासच्या १५ कॅथलिक डायोसेसन संस्थेकडूनच या पाद्य्रांवर आरोप करण्यात आले आहेत. डायोसेसनने पाद्य्रांची नावे संकेतस्थळांच्या माध्यमातून उघड केली आहेत.
१. अमेरिकेमध्ये कॅथलिक बिशप कॉन्फरन्सचे अध्यक्ष कार्डिनल डॅनियल डिनार्डो यांनी सांगितले की, लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असणार्या अनेक पाद्य्रांची वर्ष १९५० पासून चौकशी चालू आहे. यांतील काही पाद्य्रांचा मृत्यूही झाला आहे. आरोपी पाद्य्रांना अनेकांनी साहाय्य केले होते. तसेच काहींनी त्यांचा बचावही केला होता. अशा लोकांचीही नावे समोर आली आहेत. टेक्सासमधील अन्य पाद्य्रांनी अशा पाद्य्रांची नावे उघड करण्याचा निर्णय घेतला होता. ही नावे उघड करून आम्ही पीडितांना न्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्हाला दुःख आहे की, इतकी वर्षे मुलांवर अत्याचार होत होता आणि पाद्री शिक्षा मिळण्यापासून स्वतःचा बचाव करत होते.
a
२. टेक्सासमध्ये ८५ लाख कॅथलिक ख्रिस्ती आहेत. टेक्सासच्या एकूण लोकसंख्येत ते ३० टक्के आहेत. ऑगस्ट २०१८ मध्ये पेन्सिलव्हेनियामधील ३०० हून अधिक पाद्य्रांवर १ सहस्रहून अधिक मुलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर अमेरिकेतील राज्यांमध्ये प्रशासनाकडून चर्चची चौकशी चालू झाली होती.
३. भारतामध्येही गेल्या वर्षी केरळमधील एका चर्चच्या ४ पाद्य्रांवर एका महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप झाला आहे. तसेच पंजाबच्या जालंधर येथील चर्चच्या बिशपवरही एका ननने १४ वेळा लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. तसेच वर्ष २०१७ मध्ये २ महिलांच्या तक्रारीनंतर एका पाद्य्राला लैंगिक शोषणाच्या प्रकरणी अटक झाली होती.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात