प्रयागराज (कुंभनगरी) : अयोध्येत राममंदिराची उभारणी लवकर होण्यासाठी हनुमान पाठाचे अनुष्ठान करत आहोत. राममंदिर उभारण्याच्या नावावर राजकारण करणे योग्य नाही. राममंदिराच्या नावावर राजकारण करून लाभ उठवणार्या राजकीय लोकांना हनुमानाने सद्बुद्धी द्यावी, असे प्रतिपादन अग्नि आखाड्याचे महंत धर्मदास महाराज यांनी पत्रकारांशी बोलतांना केले.
महंत धर्मदास महाराज पुढे म्हणाले की, हरीचे कार्य करण्यासाठी संकल्पासमवेत स्वच्छ चारित्र्यही असावे लागते. श्रद्धेशी खेळण्याचा अधिकार कोणालाही नाही. राजकीय नेत्यांनी राममंदिरासारख्या भावनात्मक सूत्रांवर भाषण करतांना भान ठेवून बोलायला हवे. हनुमान हे रामाचे दूत आणि संकटमोचन आहेत. त्यामुळे हनुमानाची उपासना करून राममंदिरावरील संकट दूर होण्याच्या उद्देशाने हनुमानाचे पठन करत आहे.