- देशाच्या इतिहासात जे घडले आहे, तेच जर कोणी सांगत असेल, तर त्यात चुकीचे काय ? याला विरोध करणे म्हणजे इतिहास नाकारण्यासारखे आहे. हा इतिहास स्वतःच्या मुळावर येत असल्यामुळेच मुस्लिम लीग थयथयाट करत आहेत.
- हिंदूंची मंदिरे पाडणारे भारताबाहेरून आलेले मुसलमान आक्रमक होते. त्यांच्याशी मुस्लिम लीगचे नाते काय आहे ? आणि त्यांना हा इतिहास सांगितल्यावर राग का येत आहे ?, हे प्रश्न उपस्थित होतात !
- मुसलमान त्यांच्या श्रद्धास्थानांविषयी सतत जागरूक असतात. किती हिंदू स्वतःच्या श्रद्धास्थानांविषयी जागरूक असतात ?
मंगळूरू (कर्नाटक) : देशभरातील ४० सहस्र मंदिरे पाडून तेथे मशिदी बांधण्यात आल्या आहेत, असे विधान केल्यावरून हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्य समन्वयक श्री. गुरुप्रसाद गौडा यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी, यासाठी अखिल भारत मुस्लिम लीगकडून पोलीस आयुक्त टी.आर्. सुरेश यांना निवेदन देण्यात आले. ‘अशा विधानामुळे युवा समाजामध्ये मुसलमानांच्या विरोधात चुकीची भावना निर्माण होते. सामाजिक समरसतेला धक्का निर्माण होऊन हिंदु तरुणांमध्ये धार्मिक द्वेष पेरण्याचे कपट या विधानामध्ये दडलेले आहे. त्यामुळे या विधानाच्या विरोधात कारवाई करण्यात यावी’, असे या निवेदनात म्हटले आहे. (मुस्लिम लीगसारख्या संघटना कधी देशातील शांतता नष्ट करणार्या जिहादी आतंकवादी संघटना, काश्मीरमधून साडेचार लाख हिंदूंना पळवून लावणारे धर्मांध यांविषयी का बोलत नाहीत ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
निवेदन देतांना अखिल भारत मुस्लिम लीगचे राज्य उपाध्यक्ष सी. अहमद जमाल, राज्य समितीचे सदस्य महंमद इस्माईल, नेते शरीफ, रियाझ, इम्तियाझ आदी उपस्थित होते.
भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र असून सर्व धर्मियांना त्यांच्या धार्मिक नीतीनुसार जगण्याचा अधिकार घटनेने दिला आहे. (भारतातील धर्मांध घटनेनुसार वागतात का ? हिंदूंच्या सणांच्या काळात आणि इतर वेळी दंगली घडवून हिंदूंना वेठीस धरण्याचे काम ते करत आहेत. त्याविषयी मुस्लिम लीग मूग गिळून गप्प का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करावे, हे विधान घटनाविरोधी आणि गंभीर आहे, असेही या निवेदनात म्हटले आहे. (भारताची फाळणी ही धर्माच्या आधारावर झाली आहे. त्यामुळे ज्यांना हिंदु राष्ट्राविषयी पोटशूळ उठते, त्यांनी पाकमध्ये चालते व्हावे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात