आम्ही ऑनलाइन मागणी करून सनातनची सात्त्विक उत्पादने खरेदी करणार : विदेशातील भाविकांच्या प्रतिक्रिया
प्रयागराज (कुंभनगरी) : जर्मनी, इटली आणि इंग्लंड या देशांतील भाविकांनी कुंभमेळ्यातील सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला नुकतीच धावती भेट दिली. या वेळी त्यांनी सनातन आणि हिंदु जनजागृती समिती यांचे ग्रंथ अन् सनातनची सात्त्विक उत्पादने यांची माहिती घेतली. ग्रंथप्रदर्शन आणि उत्पादने आवडल्याने सलग २-३ दिवस विदेशातील काही भाविक प्रदर्शनाच्या ठिकाणी येऊन उत्पादने खरेदी करत होते.
विदेशातील काही भाविकांनी सनातनचा भीमसेनी कापूर आणि अत्तर हातात घेऊन त्याचा वास घेऊन परीक्षण केले. या वेळी त्यांना ही उत्पादने पुष्कळ आवडली. त्यानंतर बर्याच भाविकांनी भीमसेनी कापूर, अष्टगंध, दंतमंजन यांसह इतर उत्पादने खरेदी केली. ‘आम्हाला वेळ अल्प असून आम्ही लगेच मायदेशी परतणार आहोत, तसेच आमच्याकडे साहित्यही अधिक असल्याने आम्ही सनातनची सर्व उत्पादने खरेदी करू शकलो नाही. त्यामुळे आम्ही उत्पादने आणि ग्रंथ यांची ऑनलाइन मागणी करून सनातनची उत्पादने खरेदी करणार आहोत’, अशा प्रतिक्रिया विदेशातील भाविकांनी सनातनच्या साधकांजवळ व्यक्त केल्या.
आम्ही गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट देऊ ! – जर्मनी, इटली आणि इंग्लंड येथील भाविक
जर्मनीचे ताजांना लिसॅक, इटलीचे ओरियाना रॅव्हाझी आणि लंडन (इंग्लंड) येथील अलका जोशी या भाविकांना सनातनचे ग्रंथप्रदर्शन अन् प्रदर्शनातील ‘एस्.एस्.आर्.एफ्.’ची (‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’ची) ध्वनीचित्रचकती पुष्कळ आवडली. या वेळी त्या तिघांनी गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट देऊन अध्यात्माची सर्व माहिती घेऊ, तसेच ‘एस्एस्आर्एफ्’शी संपर्क साधू, असे सांगितले.