चेन्नई : ‘हिंदु ऐक्य मुन्नानी’च्या (हिंदु संयुक्त आघाडीच्या) नेतृत्वाखाली हिंदु संघटनांनी नुकतीच चुलाई, चेन्नई येथे एक बैठक घेऊन एकत्रितपणे काम करण्याच्या आवश्यकतेवर चर्चा केली. या बैठकीत भारत हिंदु मुन्नानी, हिंदु मक्कल मुन्नानी, अखिल इंडिया हिंदु महासभा, अखिल इंडिया हिंदु सत्य सेना, हिंदु जनजागृती समिती इत्यादी संघटना सहभागी झाल्या होत्या. शिवसेनेचे श्री. राधाकृष्णन् यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली. प्रत्येक संघटनेच्या नेत्यांना त्यांचे मत मांडण्याची संधी देण्यात आली होती. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सौ. सुगंधी जयकुमार, श्री. जयकुमार आणि पू. (सौ.) उमा रविचंद्रन् या बैठकीत सहभागी झाल्या होत्या. विविध हिंदु संघटनांचे अनुमाने १०० नेते या बैठकीत सहभागी झाले होते.
श्री. राधाकृष्णन् यांनी या वेळी हिंदु राष्ट्राविषयी मार्गदर्शन करणार्या परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी हिंदु नेत्यांना प्रतिवर्ष गोव्यात होणार्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात सहभागी होण्याचे आवाहन केले. सौ. उमा रविचंद्रन् यांनी हिंदुत्वनिष्ठांनी संघटितपणे कार्य करण्याच्या आवश्यकतेवर मार्गदर्शन केले. त्यांनी समष्टी साधनेचे महत्त्व विशद केले.