उपस्थित महिलांची स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग चालू करण्याची मागणी
मुंबई : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने परळ येथील महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ आणि कोळीवाडा (वरळी) येथील गोल्डन क्रीडा मंडळ येथे शौर्यजागरण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी समितीच्या कार्यकर्त्यांनी सध्या महिलांवर होणार्या अत्याचारांचे प्रमाण वाढत असल्याने महिलांनी स्वरक्षण प्रशिक्षण शिकणे आवश्यक असल्याचे सांगितले. या वेळी स्वरक्षणाची प्रात्यक्षिकेही दाखवण्यात आली. उपस्थित महिलांनी स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग चालू करण्याची मागणी केली.