वर्धा : ‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली शाळा-महाविद्यालये यांच्या परिसरात होणारे अपप्रकार रोखण्यात यावेत, तसेच १४ फेब्रुवारी हा दिवस शाळा-महाविद्यालये यांमध्ये मातृ-पितृृ पूजनदिन म्हणून साजरा करावा याविषयी मुख्याध्यापक तथा प्राचार्य यांना प्रोत्साहन देण्यात यावे यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ८ फेब्रुवारी या दिवशी स्थानिक जिल्हाधिकार्यांच्या नावाने उपविभागीय अधिकारी श्री. उत्तम दिघे यांना, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली आणि जिल्हा शिक्षणाधिकारी श्री. एस्.आर्. मेश्राम यांना निवेदने देण्यात आली. या वेळी समितीचे श्री. जगदीश इंगोले, सौ. वनिता किरसान, सौ. भक्ती चौधरी, सौ. विजया भोळे आदी उपस्थित होते. अशाच प्रकारचे निवेदन समितीच्या सौ. नलिनी कोहाड आणि सौ. अनीता फुसे यांनी सिंदी (रेल्वे) येथील पोलीस निरीक्षक श्री. काळे यांना दिले.