कोची (केरळ) : येथील चेल्लानम्मधील प्राचीन श्री मरुवान मंदिरात तेथील उत्सवाच्या अनुषंगाने हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना प्रवचन देण्यास बोलावण्यात आले होते. या वेळी समितीच्या वतीने कु. प्रणिता सुखठणकर यांनी ‘देवालय दर्शनाचे महत्त्व आणि शास्त्र’ ‘कुलदेवतेचे आणि दत्ताच्या नामजपाचे महत्त्व’ यांविषयी सांगितले. या प्रवचनाचा १०० पेक्षा अधिक लोकांनी लाभ घेतला. अनेकांना विषय आवडला आणि त्यांनी ‘पुन्हा प्रवचनास बोलावू’, असे सांगितले. याच मंदिरात उत्सवाच्या आदल्या दिवशी वरील विषयांवरील फलक प्रदर्शन लावण्यात आले होते.
कोची (केरळ) येथील श्री मरुवान देवस्थानमध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रवचन
Tags : Hindu Janajagruti Samiti