नवी देहली : चीनचे लष्कर लवकरच पाकिस्तानमध्ये तैनात होणार आहे. सुरक्षा एजन्सींने याची माहिती सरकारला दिली आहे. हे चिनी लष्कर ३ हजार किमी लांब चीन-पाक इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या (सीपीईएफ) सुरक्षेची व्यवस्था पाहणार आहे.
हे कॉरिडॉर पाकिस्तानचे ग्वादर बंदर ते चीनचे शिनजियांग भाग जोडतो. दुसरीकडे पाकिस्तानने ३ स्वातंत्र इन्फन्ट्री ब्रिगेड आणि २ रेजिमेंट्स महामार्गाच्या सुरक्षिततेसाठी तैनात केले आहे. एका ब्रिगेडमध्ये कमीत कमी ३ रेजिमेंट असतात. प्रत्येक रेजिमेंटमध्ये १ हजार जवान असतात. चीनचे पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) काराकोरम महामार्गाच्या सुरक्षिततेसाठी तैनात करण्यात येणार आहे.
पाकिस्तानमध्ये चिनी लष्कर असणे ही चिंतेची बाब आहे. या पूर्वी भारताने गिलगिट-बाल्टिस्तान भागात चिनी लष्कराच्या उपस्थितीवर हरकत नोंदवली होती. एका अधिका-याच्या मतानुसार, आम्ही हालचालींवर बारकाईने नजर ठेवत आहोत. आम्हाला माहिती आहे, की चिनी लष्कराची संख्या पाकिस्तानमध्ये किती असेल.
सीपीईसीचा पहिला टप्पा या वर्षी डिसेंबरमध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. तीन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होईल. चीनला भारतीय महासागरात यामुळे प्रवेश करायला मिळेल. कॉरिडोरच्या छोट्या रस्त्यांच्या माध्यमातून चीनला अरब राष्ट्रांमधून पेट्रोलियम उत्पादन आणि इंधन मिळू शकेल. चिनी अध्यक्ष शी जिनपिंगने गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात पाकिस्तानच्या दौ-यावर असताना महामार्ग बांधणी सहमती बनवली होते.
संदर्भ : दिव्य मराठी