ठाणे : धर्मनिरपेक्ष भारतात लव्ह जिहाद, धर्मांतर, हिंदु देवतांची विटंबना हे प्रकार मोठ्या प्रमाणात होत आहेत. निधर्मी म्हणवून घेणारे शासन हिंदूंसाठी काही करत नाही. सर्वधर्मसमभाव म्हणवणार्या देशात ‘हिंदूंना कायदे, तर परधर्मियांना फायदे’ अशी स्थिती आहे. ही स्थिती पालटण्यासाठी आज हिंदु राष्ट्र स्थापन करणे, ही आजच्या काळाची साधना आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाच पातशाह्या उद्ध्वस्त करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. ही त्याकाळची त्यांची साधना होती, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या वैद्या (सौ.) दीक्षा पेंडभाजे यांनी केले. मनोरमानगर, ठाणे येथील ही हिंदु राष्ट्र-जागृती सभेत त्या बोलत होत्या.
उपस्थित मान्यवर
श्री. दिव्यालोचन मोहंती, संस्थापक, गुरुकुल विद्यापीठ, श्री. शरण सरसांबे, अधिवक्ता आणि हिंदु इतिहासाचे अभ्यासक आणि श्री. विपुल ठक्कर, उद्योजक
सहकार्य
१. श्री. दिव्यलोचन मोहंती यांनी सभागृह आणि ध्वनीक्षेपक यंत्रणा विनामूल्य दिली.
२. श्री. विपुल ठक्कर म्हणाले, ‘‘आधी आपल्यापासून त्याग करायचा असतो, मग आपण इतरांना त्याग करायला सांगू शकतो. मी ठिकठिकाणी धर्मशिक्षणासाठी आणि कार्यक्रमासाठी विनामूल्य जागा देईन.’’