वर्धा : हिंदु राष्ट्र म्हणजे रामराज्यासारखे आदर्श राज्य ! केवळ राज्यघटनेत ‘हिंदु राष्ट्र’ हा शब्द आला आणि सत्ता परिवर्तन झाले, म्हणजे रामराज्याची अनुभूती येणार नाही. त्यासाठी राज्यकर्ते आणि प्रजा दोघेही प्रभु श्रीरामासारखे सात्त्विक आणि प्रामाणिक होणे अपेक्षित आहे. यासाठी आपल्याला शासन, तसेच सामाजिक क्षेत्रातील दृष्प्रवृत्तींविरुद्ध जागृत होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. मंगेश खांदेल यांनी हिंदु राष्ट्र-जागृती सभेत केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १० फेब्रुवारी या दिवशी सालोड (हिरापूर) येथील सुशिला भवन येथे ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’ घेण्यात आली. या वेळी सनातन संस्थेचे श्री. पराग बिंड उपस्थित होते. या सभेला नागरिकांचा उत्स्फूूर्त प्रतिसाद लाभला.
सनातनची मुस्कटदाबी केल्याने हिंदु राष्ट्राची स्थापना रोखता येणार नाही ! – पराग बिंड, सनातन संस्था
सनातन संस्थेचा एकाही प्रकरणात सहभाग असल्याचा पुरावा अजूनपर्यंत न्यायालयात सिद्ध झालेला नसतांना सनातन संस्थेवर बंदीची मागणी करण्यात येते. सनातन संस्थेवर बंदी लादून हिंदुत्वाचे कार्य बंद करण्याचे हे षड्यंत्र आहे. लोक ‘सनातन’पासून दूर जावेत; म्हणूनच काँग्रेसने हा कट रचला होता. हीच नीती हिंदुत्वनिष्ठ पक्षाचे राज्यकर्ते सत्तेवर आल्यावरही चालू आहे, हे दुर्दैव आहे ! ‘कोंबडा झाकला म्हणून सूर्य उगवायचा रहात नाही’, तसेच पुरोगामी, राज्यकर्ते, पोलीस यांनी सनातनची मुस्कटदाबी करण्याचे कितीही प्रयत्न केले, तरी हिंदु राष्ट्राची स्थापना त्यांना रोखता येणार नाही.’’ सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन कु. श्वेता जमनारे यांनी केले.
क्षणचित्र
सभास्थळी ग्रंथप्रदर्शन, धर्मशिक्षण फलक, तसेच क्रांतीकारकांची माहिती देणारे फलक लावण्यात आले होते.
धर्मसभेचा वैशिष्ट्यपूर्ण प्रसार
१. सालोड येथे संत माऊली कृपा मंडळाच्या वतीने भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धर्माचरणाचे महत्त्व सांगून हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे निमंत्रण देण्यात आले. याचा लाभ ५०० भक्तांनी घेतला.
२. सालोड येथील १३० महिला बचत गटांच्या माध्यमातून सभेचे निमंत्रण देण्यात आले. याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
३. सालोड येथील धर्माभिमानी श्री. गजूभाऊ तिमांडे यांनी सभेची १ सहस्र निमंत्रण पत्रके प्रायोजित केली.
४. नवरात्र उत्सव मंडळे आणि महिला बचत गट यांच्या ८ बैठका घेण्यात आल्या.