Menu Close

भारताला आता संरक्षण मंत्री नको,तर युद्धमंत्री हवा आहे : सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

कुंभमेळा प्रयागराज २०१९

प्रयागराज (कुंभनगरी) : देशात युद्धाची परिस्थिती नसतांनाही सीमेवर जवानांचे हुतात्मा होणे आपल्या देशासाठी लज्जास्पद आहे. शत्रूदेशाचा कायमचा बिमोड करण्यासाठी भारताला आता संरक्षण मंत्री नको, तर युद्धमंत्री हवा आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी येथे केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रयागराज (कुंभनगरी) येथे पुलवामा येथील आतंकवादी हल्ल्याच्या निषेधार्थ निषेध आंदोलन करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. यावेळी महामंडलेश्‍वर श्री स्वामी रुद्रदेवानंद महाराज, पंचायती आखाडा, श्री जानकीदास महाराज, राजस्थान यांसह अन्य संत आणि मान्यवर असे १५० हून अधिक राष्ट्रप्रेमी नागरिक उपस्थित होते.

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे पुढे म्हणाले की, ‘‘केवळ भारतच नव्हे,तर जगातील आतंकवादाचे-जिहादाचे मूळ पाकिस्तान असल्याने ते जगाच्या नकाशावरून मिटवले पाहिजे. देशात जिहादचे गजवा-ए-हिंदचे कोणी सर्मथक असतील, तर शोधून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. सरकारकडून केवळ कठोर शब्दात निषेधाची आवश्यकता नसून कठोर कारवाईची अपेक्षा आहे.’’

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *