अशा इतिहासद्रोही नाटकांवर सरकार आणि पोलीस स्वतःहून कारवाई का करत नाही ?
नवी देहली : देहली येथे होणार्या ‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ या इतिहासद्रोही नाटकाच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीकडून संसद मार्ग पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले.
जातीय सलोखा बिघडवणार्या या नाटकाचा प्रयोग १६ फेबु्रवारीला सायंकाळी ६.३० वाजता मावळणकर हॉल, कॉन्स्टिट्यूशन क्लब येथे आयोजित करण्यात आला आहे. ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल नॅशनल कमिटी’च्या वतीने याचे आयोजन करण्यात आले आहे. ‘हे नाटक रहित करावे आणि नाटकाला जिल्ह्यात कायमस्वरूपी बंदी घालावी’, अशी मागणी हिंदुत्वनिष्ठांनी दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. ‘ही मागणी मान्य न केल्यास विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल’, अशीही चेतावणी देण्यात आली आहे.
नाटकात छत्रपती शिवाजी महाराज, दिवंगत बाळासाहेब ठाकरे, तसेच हिंदु धर्म, देवता अन् श्रद्धास्थाने यांची अपकीर्ती !
‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकात महाराष्ट्राचा वैभवशाली इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आला आहे. या नाटकाच्या नावातच छत्रपती शिवाजी महाराज यांची अपकीर्ती करण्यात आली आहे. याशिवाय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचाही अनादर करण्यात आला आहे. इतकेच नव्हे, तर यामध्ये हिंदु धर्म, देवता आणि हिंदूंची श्रद्धास्थाने यांची अपकीर्ती करण्यात आली आहे. हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे अशा प्रकारे विडंबन करणे हा भारतीय दंड विधानाच्या कलम २९५ (अ) नुसार अपराध आहे.